तरुण भारत

”मराठा आरक्षण रद्द याला सर्वस्वी महाविकास आघाडी जबाबदार”

कडेगाव / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला. हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. मराठा आरक्षणाबाबत अपवादात्मक स्थिती अधोरेकीत करण्यात हे सरकार कमी पडलं हेच यावरून सिद्ध झालं असल्याने  सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी जाहीर निषेध यांनी व्यक्त केला. 

Advertisements

 मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आले. प्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळे बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तत्कालीन मराठी आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली टिकाव आरक्षण समितीकडून उच्च न्यायालयाने मान्य झाले होते.मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून निराशाजनक निकाल दिल्याने सर्वस्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे हे मोठे पाप आहे.

महाविकास आघाडी सरकारने आपली भुमिका स्पष्ट मांडली नाही, योग्य भुमिका घेतली नाही.सुचक मुद्दे मांडू शकले नसल्याने आपल्याला आज हे चित्र पाहायला मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण हा सध्या अंधारात आहे.तात्काळ वेळेत निर्णय नाही घेतला तर सर्व तरुणवर्ग रसत्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.यासाठी या घटकातील तरुणांचे नुकसान भरुन काढण्यासाठी दखल घ्यावी असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Related Stories

सांगली : मनसेतील राजीनामा नाट्यावर अखेर पडदा

Abhijeet Shinde

मंडणगड तालुकावासीय जपताहेत माणुसकी!

Patil_p

सांगली : अंकलगी येथील तरुणाची खलाटी येथे गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

म्युकर मायकोसिसने महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

दोन हजारची नोट झाली दुर्मिळ

Abhijeet Shinde

सांगली : कृषिपंपांची ७२० कोटी थकबाकी माफ होणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!