तरुण भारत

डिचोलीत कडकडीत लॉकडाऊन, व्यापाऱयांचा 100 टक्के सहभाग

नगरपालिकेच्या सुचनेचे पालन. शहरातील सर्व दुकाने बंद. औषधालये, राष्ट्रीयीकृत बँका, पेट्रोल पंप खुले. बाजारात आणि शहरात शुकशुकाट.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

  डिचोलीत वाढणाऱया कोरोना बाधित रूग्णांची संख्या आटोक्मयात आणण्यासाठी डिचोली नगरपालिकेने पुकारलेल्या पाच दोन वशीय संपूर्ण आणि कडक लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद लाभला. डिचोली बाजार आणि शहरातील सर्व व्यापाऱयांनी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवत पालिकेच्या सुचनेला मान दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज सर्वत्रच स्थानिक स्वराज्य संस्था?कडून स्वतः स्वेच्छा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहेत.

   डिचोली नगरपालिका क्षेत्रात आणि परिसरात मोठय़ा संख्येने कोरोना सकारात्मक रूग्ण आढळू लागल्यानंतर डिचोलीत कडक लॉकडाऊन पाळण्याच्या.सुचना आचि सल्ले नगरपालिकेला येऊ लागले. सरकारने केलेले तीन दिवशीय लॉकडाऊन कुचकामी ठरल्यानंतर लोकांनी आणखीन दहा ते पंधरा दिवस कडक लॉकडाऊनची मागणी केली होती. मात्र सरकार सध्या लॉकडाऊन घेण्याच्या तयरीत नसल्याने लोकांनी आपल्या स्थानिक राज्य संस्था म्हणजेच पंचायती नगरपालिकांवर लॉकडाऊनसाठी दबाव आणण्यास सुरूवात केली आहे.

   डिचोली नगरपालिकेची मंगळ. दि. 4 मे रोजी सकाळी नगरपालिकेत महत्वाची बैठक झाली. सधर बैठकीस सभापती तथा आमदार राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर, उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देविदास कारेकर व इतर नगरसेवकांची उपस्थिती होती. या बैठकीत सर्वानुमते डिचोली नगरपालिका क्षेत्रात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सर्वत्र संदेश देण्यात आला. तसेच मंगळवारी संध्याकाळी नगरपालिका मंडळ व आमदार राजेश पाटणेकर यांनी बाजारात फेरी मारून लोकांना दुकाने 9 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

सकाळपासून कडकडीत लॉकडाऊन

डिचोली नगरपालिकेच्या सुचनेप्रमाणे डिचोली शहरात आणि नगरपालिका क्षेत्रात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारातील आणि शहरातील व्यापाऱयांनी सकाळीपासूनच आपली दुकाने उघडलीच नाही. सकाळी केवळ वृत्तपत्र विपेत्यांनी मर्यादित काळासाठीच दुकाने उघडली होती. तर काही दुध विपेत्यांनी दुकाने सताड न उघडता दुकानाबाहेर दुधाची विक्री करून लोकांची सोय केली. या मर्यादित काळानंतर मात्र डिचोली बाजार आणि शहर पूर्णपणे बंदच राहिले. बाजारातील औषधालये आणि राष्ट्रीयकृत बँकाच खुल्या होत्या. बाजारातील किराणा सामानाची दुकाने, भाजी विक्री दुकाने, फळविपेते, बेकरी पदार्थ विपेते 100 टक्के बंदच होते. त्यामुळे सकाळी 10.30 वा. नंतर बाजारात शांतता पसरली होती. दुकानेच नसल्याने लोकांनीही बाजारात आणि शहरात फिरकणे बंद केले होते.

  डिचोली शहरातील मुख्य रस्त्यांवर खासगी आणि कदंब महामंडळाच्या बसेस चालू होत्या. डिचोली बसस्थानकावर सदर बसेसच्या फेऱया चालू होत्या. मात्र बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमीच होती. त्यामुळे बसेसना प्रवाशांच्या प्रतिक्षेत रहावे लागत होते. 50 टक्के प्रवासी क्षमाता असूनही बसेसमध्ये आवश्यक आकडय़ाने प्रवासी भरत नव्हते.

मंगळवारी मात्र बाजारात लोकांची झुंबड

मंगळवारी सकाळीच डिचोली नगरपालिकेने डिचोली नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर दुपारनंतर बाजारात आणि शहरात लोकांची सामान खरेदीसाठी वर्दळ वाढल्याचे दिसून आले. किराणा मालापेक्षा भाजी खरेदीसाठी लोकांची जास्त झुंबड होती. राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती तेव्हा लोकांनी लॉकडाऊन वाढण्याची शक्मयता लक्षात घेऊन किराणा समानाची मोठय़ा प्रमाणात खरेदी करून ठेवली आहे. मात्र या अचानक लॉकडाऊनमुळे लोकांकडे भाजीचा साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे लोकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. याचीच संधी साधून काही भाजी विपेत्यांनी भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढविल्याचेही निदर्शनास आले. भाजी किराणा सामानाबरोबरच शहरातील घाऊक मद्यविक्री केंद्रां?वरही मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली होती.

पुढील चार दिवस लोकांनी अशाचप्रकारे सहकार्य करावे – नगराध्यक्ष.

डिचोली नगरपालिकेने दिलेल्या हाकेला चांगला प्रतिसाद डिचोलीतील व्यापारी आणि लोकांनी दिला आहे. प्रथम दिवशीचा लॉकडाऊन कडकडीत पाळण्यात आला असल्याने नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी सर्वांचे आभार प्रकट करताना पुढील चार दिवसही अशाचप्रकारे लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. कोरोनावर.नियंत्रण आणायचे असल्यास लोकांनी आज सार्वजनिकरित्या लोकांमध्ये न मिसळता घरीच राहणे गरजेचे आहे. सर्वच गोष्टी सरकार आणि नगरपालिकेवर थोपविण्यापेक्षा प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखत काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हाच या संकटावर मात करण्यात आम्ही यशस्वी होणार. असेही नगराध्यक्ष फळारी यांनी म्हटले.

Related Stories

सत्तरी तालुक्मयातील पुरग्रस्त परिस्थिती मानवनिर्मित

Amit Kulkarni

मजूर निधी घोटाळाप्रकरणी लोकायुक्तचा सरकारला दणका

Omkar B

शनिवारी कोरोनाचे आठ बळी

Patil_p

गोवा-बेळगाव चोर्ला महामार्गावरील डागडुजीचे 40 टक्के काम पूर्ण

Patil_p

मार्ग अभियानचे संस्थापक स्वातंत्र्यसैनानी गुरूनाथ केळेकर काळाच्या पडदय़ाआड

Amit Kulkarni

रुमदामोल माजी सरपंच मुस्ताक शेख टीएमसीमध्ये दाखल

Sumit Tambekar
error: Content is protected !!