तरुण भारत

गोव्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर देशात सर्वाधिक

गोव्यातील 206 ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर ः गोमेकॉ अहवाल

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर (टक्केवारी) गोव्यात 48 टक्के झाला असून तो देशात सर्वाधिक असल्याचे अनुमान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काढले आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या सर्वेक्षणात गोवा राज्याची ही धक्कादायक टक्केवारी समोर आली आहे.

मागील सप्ताहातील म्हणजे 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीतील एकंदरीत तपशील गोळा करून त्याच्या आधाराने आयसीएमआरने हे अनुमान नोंदवले आहे. हरियाणाचा पॉझिटिव्ह दर दुसऱया क्रमांकावर 37 टक्के असल्याची नोंद करण्यात आली असून गोवा राज्यातील परिस्थिती किती गंभीर बनली आहे, याची जाणीव त्यामुळे समोर आली आहे.

 गोव्यातील 206 ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट

 गोवा मेडिकल कॉलेजमधील प्रिव्हेंटिव्ह ऍन्ड सोशल मेडिसीन विभागाने केलेल्या अभ्यासानुसार गोव्यातील एकूण 206 ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट म्हणून उदयास येत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे कोरोनाने गोव्याला कसा घट्ट विळखा घातला आहे, ते समोर आले आहे. सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण गोवाभर पसरले असून मृतांची संख्या वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोमेकॉने अभ्यास करण्याची सूचना संबंधित विभागाला केली होती. त्यानुसार त्या विभागाने गेल्या महिनाभराचा तपशील घेऊन एकंदरीत सर्वेक्षण केले आणि अभ्यास करून हा निष्कर्ष नोंदवला आहे. अशा प्रकारे 206 एवढय़ा मोठय़ा संख्येने ठिकाणे हॉटस्पॉट झाली असतील तर ते सर्वांसाठी धोकादायक आहे.

राज्यभरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असंतोष

गोव्यात कोरोनाची लाट चालू असतानाच अनेक पंचायती, पालिकांनी आपआपल्या क्षेत्रात ‘लॉकडाऊन’ सुरू केल्यामुळे राज्यात आता लॉकडाऊनची लाट आल्याचे दिसून येत आहे. गोव्यात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झालेले असताना व कडक लॉकडाऊनची मागणी होत असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून त्याचेच पडसाद म्हणून अनेक पंचायती, बाजार समित्या, पालिकांनी पुढाकार घेऊन आपापल्या क्षेत्रात लॉकडाऊन सुरू केले आहे. त्या लॉकडाऊनची एकंदरीत लाट पहाता आता हळूहळू संपूर्ण गोवा राज्याच ‘लॉक’ होणार की काय अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे गोवा आता लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे दृष्टीपथास येत आहे.

Related Stories

ममता बॅनर्जी 28 रोजी गोव्यात

Amit Kulkarni

गोमंतक मराठी अकादमीची आमसभेत मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जोमाने काम करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

आयकर विभागाचे महाराष्ट्र, गोव्यात छापे

Patil_p

माविन गुदिन्हो यांची साई चाफेरान मंडळाच्या नवरात्री उत्सवाला भेट

Amit Kulkarni

राज्यात 97.61 टक्के बालकांना पोलिओ डोस

Amit Kulkarni

नियमांचे पालन करून खनिज वाहतूक करावी

Omkar B
error: Content is protected !!