तरुण भारत

पशुखाद्यांच्या किमतीत वाढ, दूध उत्पादक अडचणीत

खर्चाचा ताळमेळ बसेना : शेतकऱयांसमोर संकट

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

अलिकडे शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱयांचा पशुपालनाकडे कल वाढला आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांतून नाराजी व्यक्त होत आहे. खर्च व उत्पादित दुधाची विक्री यातील फरकाचा ताळमेळ कसा बसवावा, असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱयांसमोर निर्माण झाला आहे. गाय, म्हैस, बैल व शेळय़ा-मेंढय़ा पाळणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. या लागणाऱया खुराकाचा (खाद्यांच्या) दर भरमसाठ वाढल्याने शेतकऱयांना आर्थिक फटका बसत आहे.

जिल्हय़ातील काही तालुक्मयांमध्ये पाण्याबरोबर वैरणीची समस्या भेडसावत असतानाच जनावरांना लागणाऱया पशुखाद्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लोजडाऊनचा निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही खासगी दूध संकलन करणाऱया दूध संस्थांनी दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना फटका बसला आहे. त्यातच  गेल्या काही दिवसांपासून खाद्यांचे दर वाढत चालल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

  गव्हाच्या भुशापेक्षा जनावरांना पोषक आहार म्हणून वापरली जाणारी सरकी पेंड व तुरीची चुनी महागली आहे. तसेच खाद्यांच्या किंमतीत वाढ झालेली पहायला मिळत आहे. अलिकडे शेती कसण्यासाठी लागणाऱया जनावरांची संख्या कमी झाली आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र वाढत्या पशुखाद्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पादनातून मिळणारी रक्कम यात दिवसेंदिवस मोठी तफावत निर्माण होत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे.भुसा 18 ते 23 रुपये किलो भाव आहे. तर सरकी पेंड 25 ते 30 रुपये किलोपर्यंत पोहचली आहे. ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रात डेअरीत दुधाची पतवारी पाहून व फॅटनुसार 18 ते 35 रुपयांपर्यंत दुधाचा दर मिळतो. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आले आहेत.

Related Stories

प्रज्वल, श्रीरंग, मंदास, सक्षम, पार्थ विजेते

Amit Kulkarni

स्टॅन स्वामी यांच्यासह इतरांची सुटका करा

Patil_p

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च

Patil_p

सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा ‘जागतिक वारसा नामांकन’ प्रस्तावाचा स्वीकार

Amit Kulkarni

आजपासून मुसळधार पाऊस

Omkar B

सर्वलोक सेवा फौंडेशनतर्फे भग्न प्रतिमा संकलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!