तरुण भारत

चिकनचे दर कमी झाल्याने खवय्यांची चलती

हॉटेल्स बंद असल्याने विक्री झाली कमी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

क्लोजडाऊनमुळे बंद असलेल्या हॉटेल व्यवसायामुळे चिकनची विक्री कमी झाली आहे. बॉयलर कोंबडय़ांची आवक असून विक्री मंदावल्याने दर कमी झाले आहेत. यामुळे खवय्यांची चलती सुरू आहे. बुधवारी बेळगाव शहरात चिकनचा दर 140 ते 150 रुपये प्रतिकिलो होता. अवघ्या 15 दिवसांत चिकनचा दर 100 रुपयांनी खाली आला आहे.

मटणाचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांना चिकनशिवाय पर्याय नाही. कारवार, गोवा येथून येणारी मासळीची आवक मंदावली आहे. कोरोनामुळे शरीराला पौष्टिक आहार मिळण्यासाठी चिकनची मागणी वाढली आहे. क्लोजडाऊन झाल्यापासून हॉटेल बंद आहेत. केवळ पार्सल व्यवस्था असली तरी कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चिकनची हॉटेलमध्ये होणारी विक्री कमी झाली.तसेच बाहेरील राज्यांमध्ये कोंबडय़ांची मागणी कमी झाल्यामुळे दर उतरला आहे.

15 दिवसांपूर्वी चिकनचा दर 270 रुपयांपर्यंत पोहोचला होता. उन्हाळय़ाच्या दिवसात चिकनचा दर नेहमी वाढत असतो. परंतु यावेळी विक्री मंदावल्याने दर उतरत आहे. अवघ्या 15 दिवसांत हे दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. बुधवारी बेळगाव शहर व परिसरात 140 ते 150 दराने चिकनची विक्री केली जात होती. अंडय़ांच्या दरातही घट झाली आहे. बुधवारी अंडय़ांचे दर शेकडा 440 ते 450 इतके होते. चिकन व अंडय़ांचा दर कमी झाल्यामुळे सकाळच्या सत्रात खरेदी करणाऱयांची संख्या वाढली आहे.

बाहेरील राज्यांतून मागणी कमी

हॉटेल बंद असल्याने चिकन विक्री कमी झाली आहे. तसेच बाहेरील राज्यातही चिकन कमी प्रमाणात जात असल्याने दर कमी झाले आहेत. एरव्ही उन्हाळय़ात दर वाढत असतात. परंतु यावेळी मात्र ते कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

-अहमद रेशमी (चिकन विपेता)

Related Stories

खासगी रुग्णालयातही कोरोनावर मोफत उपचार

Omkar B

पंढरपूर विठोबाचे मंदिर तीन दिवसांसाठी बंद

Omkar B

हुबळी-मुंबई रेल्वे धावणार कधी?

Omkar B

तक्रार कोणतीही असो अगोदर नोंद करा

Patil_p

दसरोत्सवासाठी ग्रामीण भागातही खरेदीसाठी गर्दी

Patil_p

विकास केल्याचा मावळत्या बुडा अध्यक्षांचा दावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!