तरुण भारत

प्लाझ्मा थेरपीचा अंतरगात

सध्या कोरोनाबाधितांची संख्या लाखाने वाढत असल्याने ऑक्सिजन बेड, कन्सट्रेटर, रेमडेसिव्हिर यासोबतच रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीच्या मदतीने बरे करता येऊ शकत असल्यामुळे प्लाझ्माची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु प्लाझ्मा थेरेपी कोरोनाबाधित रुग्णाला कशी फायदेशीर ठरु शकते आणि प्लाझ्मादान करण्यापूर्वी कोणत्या  गोष्टींचे पालन करायला पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?

Advertisements
 • प्लाझ्मा हा रक्तातील पातळ भाग असतो. यात लाल, पांढर्या पेशी असतात आणि प्लेटलेटस असतात.
 • कोरोना संसर्गातून बरे होणार्या रुग्णांचा प्लाझ्मा कोरोनाबधित रुग्णाला दिला जातो.
 • प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी असते आणि या अँटीबॉडी बाधित व्यक्तीच्या इम्यून सिस्टिमला या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी मदत करतात. परिणामी बाधित रुग्णांची लक्षणे कमी होऊ लागतात आणि बरे होण्याची प्रक्रिया वेगाने होते.
 • वास्तविक प्लाझ्मा थेरेपी ही खरोखरच उपयुक्त ठरत असल्याचे अद्याप ठोसपणे सिद्ध झालेले नाही. मात्र प्लाझ्मा हा बर्याच रुग्णांना फायदेशीर ठरत असल्याचे अनेक अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. 

प्लाझ्माने मृत्यूदर कमी होतो का?

 • काही प्रकरणात प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त ठरली आहे. पण इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार (आयसीएमआर) प्लाझ्मा थेरेपीमुळे मृत्यूदर कमी करता येत नाही.

प्लाझ्मादान करणार्यांनी कोणती खबरदारी घ्यावी?

 • प्लाझ्मा देणार्या मंडळींसाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यानुसार कोण प्लाझ्मा देऊ शकतो, याची यादीच मांडली आहे.
 • 18 ते 60 वयोगटातील आणि 50 किलोपेक्षा अधिक वजन असणारे लोक प्लाझ्मा दान करु शकतात.
 • कोरोनाची तीव्र लक्षणे नसतील तर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर चौदा दिवसांनंतरच प्लाझ्मा देता येते. रुग्णाला किरकोळ लक्षणे असली तरी तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर चौदा दिवसांनी प्लाझ्मादान करु शकतो.
 • गर्भवती महिला प्लाझ्मा देऊ शकत नाहीत.
 • कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 28 दिवसांपर्यंत ती व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकत नाही.
 • प्लाझ्मादान करणार्या व्यक्तीचे हिमोग्लोबीन काउंट 8 पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्याला कर्करोग, हार्ट डिसिज, किडनी विकार किंवा हायपरटेन्शनसारखे आजार नसावेत.

– डॉ. संतोष काळे

Related Stories

मधुमेहिंनो, पाय जपा

Omkar B

भ्रूणाच्या नाळेत ‘मायक्रोप्लास्टिक’

Omkar B

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

मार्जारासन

Omkar B

टेनिस एल्बोवर उपचार

tarunbharat

विशिष्ट खुणांची बोली सांकेतिक भाषा

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!