तरुण भारत

रेमडेसिव्हर घेताय

कोरोनाच्या प्रकोपाच्या काळात सध्या अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हीरसाठी धावाधाव करताना दिसत आहेत. पण या आगतिकतेचा फायदा घेत काही बनावट उत्पादनेही बाजारात आली आहेत.

  • दिल्ली पोलीस दलातील अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवणार्यांविषयी काही माहिती दिली आहे.
  • यानुसार रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बॉक्सवर COVIPRI हे नाव लिहिलेलं असेल तर ते बनावट इंजेक्शन असतं. त्यामुळं असा उल्लेख असणारं इंजेक्शन खरेदी करु नका.
  • बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकणार्यांनी मूळ इंग्रजीमध्ये काही फेरबदल करुन बॉक्सवर छापले आहेत. For used in india. Not for export इंग्रजी व्याकरणाच्या नियमांनुसार हे चूक आहे.
  • याखेरीज “caution’ म्हणून It is a dangerous to take this preparation Except under medical supervision हे लिहिलं आहे. व्याकरणाच्या दृष्टीनं हे देखील चूक आहे.
  • बॉक्सवर छापण्यात आलेला पत्ता देखील चुकीचा आहे. मेट्टूपलायम सिंगटममध्ये औषध बनवल्याचा दावा करण्यात आलाय. मेट्टूपलायम तामिळनाडूमध्ये तर सिंगटम सिक्कीममध्ये आहे.

Related Stories

शिशूचे मौखिक आरोग्य

tarunbharat

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

Omkar B

फळांचा रस आणि मधुमेह

Amit Kulkarni

समस्या ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिसचा

tarunbharat

कोरोना आणि लोहकण

Omkar B

ऑक्सीमीटर आणि आपण

Omkar B
error: Content is protected !!