तरुण भारत

Be positive : कुपवाडमध्ये ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाडमधील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ९५ वर्षाच्या आजी. त्यांचे नाव मुक्ताबाई रामचंद्र कारंडे. या आज्जीला कोरोनाचा संसर्गावर मात केली आहे. कुपवाड मनपाच्या डॉ.मयूर औंधकर व डॉ. अंजली धुमाळ या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आजीवर यशस्वी उपचार केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नागरिकांतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुक्ताबाई कारंडे या आजी कोरोनाबाधित झाल्यानंतर नातेवाईकांनी अनेकठिकाणी दवाखान्यात गेले. परंतु, बेड शिल्लक नसल्याने तसेच प्रकृती खालावल्याने कुठे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी महापालिकेचे डॉ.मयूर औंधकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आजीला होम आयसोलेट केल्यास उपचार करण्याचा सल्ला देऊन औषधोपचार सुरु केले. आज्जीनी जिद्दीच्या जोरावर सकारात्मकता दाखवून वेळेवर आहार आणि औषधोपचार घेतले. त्यामुळे आजीनी अखेर कोरानावर मात करून विजय मिळविला.

मुक्ताबाई कारंडे या ९५ वर्षीय आज्जी मुळ खानापूर तालुक्यातील भांबर्डे गावातील. त्या शिवशक्तीनगर येथे मुलीकडे राहतात. विट्याला त्यांची मासिक पेन्शन आणण्यासाठी गेल्यावर त्यांच्या पॉझिटिव्ह आलेल्या मुलाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. वेळेवर योग्य औषधोपचार महापालिकेच्या सिस्टर आणि आशा वर्कर यांनी दररोज तपासणी करून आधार दिला. नातेवाईकांनीही योग्य काळजी घेतल्यामुळे कारंडे आज्जींनी बुधवारी कोरोना आजारावर मात केली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना संसर्ग झाल्यावर दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार घेतल्यास कोरोना निश्चितपणे बरा होऊ शकतो. दुसऱ्या लाटेमध्ये रिकव्हरी रेट चांगला असून गृह अलगीकरणात अनेक रूग्ण योग्यरित्या उपचार घेउन बरे होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर औंधकर यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

‘ग्रामसंघ स्थापन केल्याने महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील’

Abhijeet Shinde

खानापूर तालुक्यातील अकरा रस्ते पुराच्या पाण्याने बंद

Abhijeet Shinde

आज मतमोजणी, उत्सुकता शिगेला

Abhijeet Shinde

सांगली : जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सुचना

Sumit Tambekar

सांगली : माणुसकी फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन मशीनचे वाटप

Abhijeet Shinde

सांगली : शिरसटवाडी येथील शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!