तरुण भारत

बंगाल हिंसाचार : मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई

  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा 

ऑनलाईन टीम / कोलकाता : 


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केली. 

Advertisements


त्या म्हणाल्या, ही भरपाई देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. दरम्यान,  या हिंसाचारात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अर्धे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते, अर्धे भाजपाचे आणि एक कार्यकर्ता संयुक्त मोर्चाचा होता, असेही त्यांनी सांगितले. 


यासोबत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे, असा आरोप लावला आहे. भाजपचे नेते बाहेर फिरून लोकांना भडकवत आहेत. नवीन सरकार येऊन अजून 24 तास देखील झाले नाहीत आणि ते लेटर घेऊन आले आहेत. खरेतर भाजपला अजूनही जनदेशाला स्वीकारता आले नाही आहे. मी त्या लोकांना सांगू इच्छिते की, त्यांनी लोकांचा आदेश स्वीकारावा, असेही म्हटले आहे. 


दरम्यान, आज गृहमंत्रालयाने नेमलेले चार सदस्यांचे पथक पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे. घडलेल्या हिंसाचाराची सखोल चौकशी हे पथक करत आहे. 

Related Stories

मोदी-ठाकरे भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Abhijeet Shinde

लोकशाही निर्देशांकात भारताचे स्थान घसरले

Patil_p

अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

prashant_c

कमांडर जगदीशच्या विरोधात सीबीआयचे आरोपपत्र

Patil_p

गुजरातमध्ये शालेय शिक्षणात वैदिक गणित येणार

Amit Kulkarni

नितिश कुमार तनानं भाजपसोबत, मनानं आमच्यासोबत – संजय राऊत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!