तरुण भारत

कुपवाडमध्ये तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना अटक

कुपवाड / प्रतिनिधी 

कुपवाडमधील बजरंगनगर भागात एका घराशेजारी मोकळ्या जागेत तीन पानी जुगार खेळणाऱ्यांवर बुधवारी रात्री कुपवाड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चौघाना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील जुगारातील रोखड व साहित्यासह २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अटक केलेल्यामध्ये चंद्रकांत कल्लाप्पा मोदी (वय २३), सुनिल मारुती खटके (वय २८), तौफिक मुजावर खान (वय २७, तिघेही रा.बजरंगनगर, कुपवाड), अहमद मकसूद खान(वय २६,रा.जकातनाका, कुपवाड) अशी नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, कुपवाडमधील बजरंगनगर भागात एका घराशेजारी मोकळ्या जागेत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल यांच्या पथकाने तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी अटक केलेले संशयित चौघेजण तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले.यावेळी पोलिसांनी जुगार अड्ड्यातील रोख रक्कमेसह २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisements

Related Stories

सांगली : वारणालीतील नियोजित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेची जयंत पाटील यांनी केली पाहणी

Abhijeet Shinde

“शिक्षणातून सद्गुणांचे व मूल्यांचे संवर्धन व्हावे”: सुभाष कवडे

Abhijeet Shinde

उपेक्षित माणसांच्या अलक्षित जगण्याचे मुलुखमातीमधून चित्रण

Abhijeet Shinde

कोटणीस महाराजांच्या उत्सवाला प्रारंभ

Abhijeet Shinde

सांगली : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Abhijeet Shinde

सांगली : मणेराजूरीजवळ कार पलटी होवून एक जण ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!