तरुण भारत

निसरे पुलावरून मुलगा वाहून गेल्याची भीती

वार्ताहर / मल्हारपेठ

येथील चौदा वर्षीय मुलगा निसरे पुलावर कोयना नदीवर स्नान करायला गेल्यानंतर वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मल्हारपेठ येथील ज्वेलर्स कारागीर विकास पंडित हे आपला मुलगा विश्वतेजला घेऊन सहा मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास निसरे येथे नवीन पुलाजवळ स्नानासाठी गेले होते. काही वेळ नवीन पुलाजवळ स्नान केल्यानंतर पुन्हा निसरे बाजूला जुन्या फरशी पुलाजवळ पोहायला गेले. त्यावेळी जुन्या फरशी पुलाजवळील पहिल्या मोहरीतून विश्वतेज विकास पंडित हा आठवीत शिकणारा मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याच्या सोबतीला असणाऱया इतर मुलांनी खूप आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. सर्वांनी सुमारे चार तास सर्वत्र शोध घेतला पण विश्वतेज सापडला नाही. सायंकाळपर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती

Advertisements

Related Stories

खाकीची मानसिकता ढळतेय…!

Patil_p

साताऱ्यात कॉम्प्युटर, टायपिंग इन्स्टिटयुट सुरु करण्यास परवानगी

Shankar_P

वारणानगर (लांडेवाडी) येथे दोन कोरोना रुग्ण आढळले

Patil_p

कास परिसरात वणव्यांने वनसंपदेची होरफळ

Patil_p

तीन दिवसात 4204 जणांची कोरोनावर मात

Patil_p

राजेंची वाट न पहाता 6 रोजी हॉकर्स चौपाटी सुरु करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!