तरुण भारत

साताऱयातील 20 हॉस्पिटलला फायर ऑडिटच्या नोटिसा

दुर्घटना घडू नये म्हणून मुख्याधिकाऱयांनी केले आवाहन : शहरातील व्यावसायिकांनाही केले फायर ऑडिट करावे

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

राज्यात हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनमुळे तसेच सतत एसी सुरू ठेवल्याने आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील हॉस्पिटलमध्ये आग लागण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी पालिकेने 20 हॉस्पिटलना फायर ऑडिट करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. तसेच शहरातील सर्व व्यावसायिकांनी फायर ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये काही हॉस्पिटलमध्ये आगी लागण्याचे प्रकार घडले होते. हकनाक रुग्णांचे जीव गेले. तसे प्रकार सातारा शहरातील हॉस्पिटलमध्ये घडू नयेत याकरिता सातारा पालिकेने शहरातील 20 हॉस्पिटलना फायर ऑडिट करून घेण्याचे नोटीस बजावले आहे. तसेच इतर व्यावसायिकांनी फायर ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र शासनाने जीव प्रतिबंधक उपाययोजना 2006 नुसार लागू केलेले आहेत. या अधिनियमातल्या तरतुदीनुसार सर्व प्रकारचे इमारतीना फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. सर्व व्यावसायिक यांनी ही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी इमारतीमध्ये ऑडिट करणे गरजेचे आहे. अग्निग्नशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील 20 हॉस्पिटलना नोटीस बजावले आहे.

Related Stories

सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना बॉयलर स्फोट,एक ठार तर सहा जखमी

Abhijeet Shinde

महाबळेश्वरमध्ये कार खड्डयात कोसळून दोन जखमी

datta jadhav

कोयना, उरमोडीतून विसर्ग सुरु

Patil_p

सातारा : दैव बलवत्तर होत म्हणून वाचला जीव…

Abhijeet Shinde

कमानी हौदाला पुन्हा गतवैभव मिळणार का?

Patil_p

सोमर्डी आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा द्या – आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हील सर्जन डॉ. गडीकर यांना केल्या सुचना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!