तरुण भारत

लॉकडाऊनला 21 दिवस पूर्ण; बाधितांचा आकडा वाढताच

गुरूवारी अल्प दिलासा पण चिंता कायम : 2292 जण पॉझिटिव्ह,1595 जणांना डिस्चार्ज,40 जणांचा मृत्यू लसीकरणाला पुन्हा वेग

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हय़ात 15 एप्रिलपासून अंशतः लॉकडाऊन सुरू झाला. नुकताच लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. 21 दिवस जिल्हा बंद अवस्थेत असूनही कोरोनाच्या आकडय़ांची गती मंदावत नसल्याचे दिसत आहे. पीक अवस्थेत असलेला संसर्ग आटोक्यात कधी येणार? हा प्रश्न आता प्रत्येकाला सतावत आहे. बुधवारचा अहवाल गुरूवारी सकाळी जाहीर झाला. त्यात 2292 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 40 जणांचा मृत्यू झाला असून 1595 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ब्रेकनंतर लसीकरण वेगाने होऊ लागले आहे.

टाळेबंदीचा परिणाम कधी दिसणार?

जिल्हय़ात 15 एप्रिलपासून अंशतः लॉकडाऊन सुरू झाला आहे. यात अत्यावश्यक सेवांना फक्त परवानगी देण्यात आली होती. मात्र अत्यावश्यकच्या नावाखाली वर्दळ सुरूच होती. त्याचा मात्रा लागू पडत नसल्याने पालकमंत्र्यांच्या आदेशाने निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. गेले 21 दिवस जिल्हा बंद अवस्थेत असूनही बाधितांचे आकडे कमी होताना दिसत नाहीत. आठवडय़ापूर्वी 2 हजारावर असलेला आकडा आता 2500 पर्यंत येताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये संसर्ग आटोक्यात येत असताना सातारा जिल्हय़ातील संसर्ग आटोक्यात कधी येणाऱ? याकडे प्रशासनासह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2292 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून यात सातारा शहर व तालुक्यात सर्वाधिक 483 रूग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली आहे.

खटाव तालुक्यात 312 रूग्ण

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 92 (5527), कराड 279 (17285), खंडाळा  81 (7139), खटाव 312 (10035), कोरेगाव 127 (9743),माण 179 (7467), महाबळेश्वर 36 (3468), पाटण 144 (4827), फलटण 392 (15175), सातारा 483 (26393), वाई 147 (8731) व इतर 20 (627) असे आजअखेर एकूण 116417 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

गेल्या चोवीस तासात 40 जणांचा मृत्यू झाला असून 12 मृत्यू सातारा तालुक्यात झाले आहेत. मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 2 (108), कराड 6 (475), खंडाळा 4 (92), खटाव 3 (281), कोरेगाव 4 (253), माण 1 (152), महाबळेश्वर 0 (34), पाटण 0 (123), फलटण 3 (197), सातारा 12 (805), वाई 5 (220) व इतर 0 असा आजअखेर जिह्यामध्ये एकूण 2740 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1595 नागरिकांना दिला डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1595 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

9168 जणांना लसीकरण

जिल्हय़ाला लशीचा पुरवठा पुन्हा होऊ लागला आहे. परंतु पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. लसीकरणाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून पुरेशी लस उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. गुरूवारी 9168 जणांना लसीकरण करण्यात आले. आज अखेर पहिल्या डोसचे 5 लाख 40 हजार 145 तर दुसऱया डोसचे 87 हजार 657 अहश एकूण 6 लाख 27 हजार 802 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

Related Stories

सातारा : जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Shankar_P

सातारा जिल्ह्यात दुकाने रात्री 9 पर्यंत खुली राहणार

Shankar_P

देशमुखनगरच्या चोरट्या दारू अड्डयावर बोरगाव पोलिसांची दमदार कारवाई

datta jadhav

ते आले, आदेश दिला आणि अतिक्रमण प्रश्न निकाली

Shankar_P

वाई वनविभाग आणि महसूलमध्ये जुंपली

datta jadhav

हॉकर्स सोमवारी मुख्याधिकाऱयांना घालणार घेराव

Patil_p
error: Content is protected !!