तरुण भारत

जम्बो कोविड सेंटर परिसर स्वच्छ करण्याची परवानगी मिळवण्याची मागणी

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मागणी

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या परिसरात कचऱयाचे साम्राज्य वाढत आहे. हे कचऱयांचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची परवानगी मिळावी अशी मागणी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सातारा जम्बो कोविड सेंटरचे व्यवस्थापक सुरेंद्र दबडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही परवानगी दबडे यांनी दिली आहे.

 कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने जम्बो कोविड सेंटर येथे दररोज पेंशट येत आहेत. तसेच नातेवाईक यांचाही वावर सतत असतो. यामुळे परिसरात स्वच्छता असणे गरजेचे आहे. यासाठी बिल्डर असोसिएशन यांच्या वतीने हा परिसर साफसफाई साठी सेवाकार्य म्हणून काम करण्याची इच्छा आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या मागणीचा विचार करत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांना 1 महिन्यांची परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

सातारा : दिवसभरातील 37 जणांसह जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे चौथे शतक

triratna

गावठी पिस्तूलसह परप्रांतिय जेरबंद

Patil_p

कराडच्या नगराध्यक्षा पुन्हा सक्रीय

Patil_p

सातारा जिल्ह्यात ५१ कोरोनाबाधित रुग्णांची भर

triratna

वरिष्ठ राष्ट्रीय ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

Shankar_P

बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश; कोरोना रुग्णांवर करत होती उपचार

datta jadhav
error: Content is protected !!