तरुण भारत

औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा शिरकाव

15 टक्के उपस्थितीत काम सुरू : काळजी घेण्याची गरज वाढली

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

दिवसेंदिवस कोरोना रौद्ररुप धारण करत आहे. सातारा येथे दयनीय अवस्थेत सुरू असणाऱया औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून एका नामांकित कंपनीतील कर्मचाऱयांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संबंधित कंपनीसह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱयांच्या केवळ 15 टक्के उपस्थितीत काम सुरू ठेवले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा येथील नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये एक नामांकित कंपनी कार्यरत आहे. या कंपनीच्या दोन शाखा कार्यरत असून ही कंपनी आपली उत्पादने देशात व देशाबाहेर निर्यात करते. चार दिवसांपूर्वी या कंपनीतील एका कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाली. त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

मुळात औद्योगिक वसाहतीमधील सर्वच कंपन्यांनी कोरोनाबाबत खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. कंपनीत येताना आणि जाताना हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, काम करताना सोशल डिस्टन्स पाळणे आदी उपाययोजना केल्या असतानाही कोरोनाने औद्योगिक वसाहतीमध्ये शिरकाव केल्यामुळे कर्मचायांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता आणि कंपनीने केवळ 15 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत काम सुरू ठेवले आहे.

Related Stories

सातारा : कत्तलीसाठी नेत असलेल्या 15 म्हैशींची सुटका

datta jadhav

फलटणमध्ये 9 लाख रूपये किमंतीचे गोमांस हस्तगत

Patil_p

शिकारीचं वनविभागाच्या जाळ्यात ; १२ संशयित ताब्यात

triratna

महावितरण कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून काम बंद आंदोलन

datta jadhav

सातारा : आयआरके सिनेमाच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

datta jadhav

दारुसाठी पैसे न दिल्याने एकावर कोयत्याने वार

Patil_p
error: Content is protected !!