तरुण भारत

जिह्यात स्वॅब टेस्टिंग वाढवण्याची गरज

बाधित रूग्णांचा चढता आलेख ठरतोय लक्षवेधी   : संपर्कात आलेल्या नागरिकांची स्वॅब टेस्ट झाली गरजेची

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची गतवर्षी प्रमाणे स्वॅब टेस्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. या स्वॅब टेस्ट केल्याने आणखी बाधित रूग्णांची माहिती मिळणार आहे. यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर दररोज 6 हजार नागरिकांचे स्वॅब टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली. 

     कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व रूग्णांची स्वॅब स्टेट करण्यात येत होती. यामुळे बाधित रूग्णांची संख्या ही वाढली होती. ज्या रूग्णंची लक्षणे सौम्य होती. त्यांना होम आयसोलेट करण्यात येत होते. गत वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. दररोज रूग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. ही वाढ थांबण्यासाठी पुन्हा बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची स्वॅब टेस्ट करणे गरजेचे झाले आहे. ही टेस्ट सरकारी ते खाजगी रूग्णालयात करण्यात येत आहे. यासोबत शहरातील विविध ठिकाणी कॅम्प घेतले जात आहे. एका दिवसाला 6 हजार नागरिकांचे स्वॅब टेस्ट करण्यात येत आहेत. आता ज्या भागात किंवा इमारतीत रूग्ण सापडत आहेत. तेथील नागरिकांची स्वॅब टेस्ट करणे गरजेचे झाले आहे.

Related Stories

कराडला उच्चांकी 100 मिमी पाऊस

Patil_p

कोयना धरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Patil_p

विनाकारण फिरणाऱया चार जणांवर गुन्हा दाखल

Patil_p

दहा हजारांच्या लाचप्रकरणी दोघांवर कारवाई

Patil_p

सावधानी बाळगणे हाच मोठा उपाय

Patil_p

बनावट नोटांसह गावठी कट्टा जप्त

Patil_p
error: Content is protected !!