तरुण भारत

साताऱयाला पुन्हा अवकाळीने झोडपले

विजांच्या कडकडाटांसह धुवाँधार बरसत : लॉकडाऊन यशस्वी करण्यास हातभार

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

सातारा शहर व परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून सकाळी उन्हाचा कडाका तर सायंकाळ अवकाळी पावसाची धुवाँधार बरसत असा खेळ सुरु आहे. एकीकडे कोरोनाने थैमान घातलेले असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला असून पावसाच्या भितीने लोक घरात बसत असल्याने अवकाळीचा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी हातभार लागत असल्याचे सातारकरत अनुभवत आहेत. गुरुवारी साडेचारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटांसह अर्धा पाऊण तास पावसाने पुन्हा धुवाँधार बरसात केली.

सातारा शहर व परिसरात दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला होता व यावेळी वारेही वाहत होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. गुरुवारी दिवसभरत उन्हाचा कडाका नागरिक सहन करत लॉकडाऊनमुळे घरात बसलेले होते. गुरुवारी पुन्हा चार वाजल्यापासून ढगाळ वातावरण झाले. साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट करत अवकाळी चांगलेच झोडपून काढल्याने शहरातील रस्त्यावरुन पावसाचे पाणी वाहत होते.

सुरुवातीला मोठ मोठे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. आकाशात ढग जमा झाल्याने अंधारून आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत रिमझिम स्वरूपात पाऊस पडत होता. तसेच ढगांचा गडगडाटही सुरू होता. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सातारा शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना निवारा शोधावा लागला. तर वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

पाच वाजताच पडला होता अंधार

अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर पावसाने सुरुवात केली. त्यातच वीजांच्या कडकडाटाने थरकापही उडत होता. अर्धा पाऊण पावसाने शहर व परिसरावर बरसत केली. सायंकाळपर्यंत रिमझिम पडतच राहिला. यामुळे सायंकाळी 5 वाजताच वातावरण अंधारुन गेले होते. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे अवकाळी भर कडक उन्हाळय़ात पडत असला तरी त्याचा आनंद नागरिक घेवू शकत नव्हते.

पावसामुळे रस्ते पडले ओस लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झालेले असली तरी सातारा शहरात अनेक कोव्हिड हॉस्पिटल्स असल्याने थोडीफार वर्दळ सुरुच असते. त्यातूनच मधूनच रुग्णवाहिकांचा वेगाने येजा सुरु असते. पावसाने झोडपल्याने रस्त्यावरील थोडीफार असलेली वर्दळ देखील नसल्याने शहरातील रस्ते ओस पडले होते. अधून मधून बंदोबस्तावर असलेले पोलीस बांधव पावसात भिजल्याने कपडे बदलण्यासाठी घरी जाताना दिसत होते.

Related Stories

अनवडी येथे युवकाची आत्महत्या

Shankar_P

कहर होतोय कमी, मृत्यूदर रोखण्याचे प्रयत्न सुरू

Patil_p

सातारची चौपाटी आता ‘आळूच्या खड्डय़ात’

Patil_p

सातारा : उरमोडी कालवा सल्लागार समिती सदस्यपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड

datta jadhav

कराडमध्ये मेंढपाळासमोरच बिबट्यांचा मेंढ्यांवर हल्ला

Shankar_P

सातारा : शिवभक्त बापलेकीची सुरू आहे गडांची भ्रमंती

triratna
error: Content is protected !!