तरुण भारत

काँग्रेस कमिटीवर दगडफेक करणाऱयांचा निषेध

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी  कार्यालयावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. अशा विकृत प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा जिल्हा काँग्रेस कमिटी जाहीर निषेध करत आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी  कार्यालयावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. अश्या विकृत प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा जिल्हा काँग्रेस कमिटी जाहीर निषेध करत आहे.ज्यानी कोणी हे समाज विघातक , निंदनीय कृत्य केले त्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जिल्हा सरचिटणीस – ऍड. दत्तात्रय धनावडे आणि अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष – मनोज तपासे यांनी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. आजची परिस्थिती कोरोना उद्रेकाची आहे. अश्या परिस्थितीत काही समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होईल सामाजिक स्वास्थ्य बिघडेल. अशा घटना हेतुपुरस्पर घडवून आणल्या असाव्यात आरोपी लवकरच पोलिसांना सापडतील त्यामुळे कोरोना सारख्या बिकट अवस्थेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि कोरोना रुग्णांना सहकार्य करावे. जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

नागरिक मोठया संख्येने पडले घराबाहेर

Patil_p

कोल्हापूर -पुणे मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढल्या

triratna

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाच्या रिक्त जागेची दि.21रोजी निवड

Patil_p

पालिका कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान द्या

Patil_p

प्रशासनाला अंधारात ठेवत बगाड यात्रा

Patil_p

‘रेमडेसिवीर’चे वितरण अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच

datta jadhav
error: Content is protected !!