तरुण भारत

कोरोनाने थांबले ‘ऍथलॅटिक्स’चे मैदान

दिड वर्ष सरावाविना  : जिह्यातील 3 हजारउभरत्याखेळाडूंनाफटका

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

कोरोनामुळे जिह्यातील ऍथलॅटिक्स खेळावर विपरित परिणाम झाला आह़े मागील दिड वर्षापासून स्पर्धा व सराव बंद असल्याचा फटका जिल्हाभरातील 5 हजार खेळाडूंना बसला आह़े विषेशतः वयोगटांच्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱया खेळाडूंना आताचा वयोगट सोडून पुढील वर्षी मोठय़ा वयोगटात खेळावे लागणार आह़े दीर्घकाळ थांबलेला सराव व स्पर्धांचा अभाव यामुळे अनेकांचे भवितव्यच अंधारमय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 ऍथलॅटिक्स स्पर्धांमध्ये धावणे, लांबउडी, उंचउडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक आदी प्रकारच्या विविध स्पर्धांचा समावेश होत़ो जागतिक स्तरावरही या स्पर्धांना विशेष महत्व आह़े रत्नागिरी जिह्याचा विचार करता ग्रामीण भागातील मुले या स्पर्धांमध्ये हिरिरीने सहभाग घेताना दिसून येतात़ साधनसामुग्रीची कमतरता असतानाही राज्य तसेच देशपातळीवर जिह्यातील खेळाडू चांगली लढत देत विजयश्री खेचून आणतात़ मागील काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिह्यामध्ये खेळांसाठी पोषक वातावरण तयार झाले होत़े

  रत्नागिरीमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा तसेच विविध संघटनांकडून अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत़े मॅरेथॉन, दौड, प्रशिक्षण शिबिरे यांचेही सातत्याने आयोजन केले जाते. अन्य जिह्यात वा राज्यातील स्पर्धांमध्येही खेळाडू सहभागी होत असतात. मागील दिड वर्षापासून कोरोनाचे संकट उभे राहिले आह़े त्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्य़ा  प्रशिक्षण घेणाऱया खेळाडूंचे प्रशिक्षण व सराव बंद झाल्याने खेळांची सवय मोडली आह़े  त्याचा परिणाम त्याच्या खेळावर हाण्याची शक्यता आह़े  यात विशिष्ट वयोगटात खेळणाऱया खेळाडूंचे नुकसान झाले आह़े  चालू वर्षात 16 वयोगटाखाली खेळणाऱया खेळाडूला स्पर्धा न झाल्याने पुढील वर्षी 18 वर्षाखालील वयोगटात खेळावे लागणार आह़े

  पहिल्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर खेळांचा सराव करण्यास राज्य शासनाकडून मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली होत़ी मात्र ऍथलॅटिक्ससारख्या खेळांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळणे कठीण होत असल्याने हे सराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल़ा सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाच्या नियमांचे पालन करून काही स्पर्धा खेळविण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यालाही पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात आल़े  ऍथलॅटिक्स खेळ मैदानी स्वरूपाचे असल्याने चार भिंतीमध्ये त्याचा सराव अथवा स्पर्धा घेणे शक्य होत नाह़ी या स्पर्धा मोकळ्य़ा मैदानात सार्वजनिक ठिकाणी घ्याव्या लागतात़ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी किमान 1 वर्ष या खेळांच्या स्पर्धा होणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आह़े याचा दीर्घकालीन परिणाम या क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांवर होणार आहे.

वयोगटातील खेळाडूंचे मोठे नुकसान

नियमित सराव करणाऱया खेळाडूंना स्पर्धेत सहभाग घेवून यश संपादन करण्याची इच्छा असत़े त्यासाठी लागेल ती मेहनत खेळाडू घेत असतात़ मागील दिड वर्षापासून ऍथलॅटिक्स खेळांच्या स्पर्धाच होत नसल्याचे खेळाडूंचे मोठे नुकसान होत आह़े विशेष करून वयोगटात खेळणाऱया खेळाडूंना पुढील वर्षी आताच्या वयोगटात स्पर्धा खेळताना येणार नाह़ी सध्याच्या वयोगटात चांगली कामगिरी करण्याची त्यांची संधी हुकली आह़े

-संदीप तावडे, पदाधिकारी, राज्य ऍथलॅटिक्स असोसिएशन.

Related Stories

रत्नागिरी : सागरी सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा राम भरोसे

triratna

खोदकामात पाईपलाईन फोडल्याने तब्बल दहा मिनिटे गॅस लिकेज

Patil_p

प्रधानमंत्री मातृवंदनेची प्रभावी अंमलबजावणी, अर्भक मृत्यू दर घटला

Patil_p

नरबेत चक्कर येवून पडलेल्या तरूणाची दुचाकी चोरीला

Patil_p

पारा घसरला, बागायतदार सुखावला

Patil_p

राजापूर पंचायत समिती सभापतीपदी प्रमिला कानडे बिनविरोध

Patil_p
error: Content is protected !!