तरुण भारत

आता माशांसाठीही रोगप्रतिकारक लस

– आयसीएआर व सीआयबीएचे संशोधन; मत्स्यशेती करणाऱया शेतकऱयांना दिलासा – नोडॅव्हॅक-आरमुळे विषाणूंचा नायनाट शक्य

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

नर्वस नेक्रोसिस व्हायरसने (व्हीएनएन) मोठय़ा प्रमाणात मृत होणाऱया माशांसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) व केंद्रीय खारे जलजीव पालन अनुसंधान संस्थानने (सीआयबीए) लसीचा शोध लावला आह़े सीबा नोडॅव्हॅक-आर असे या लसीचे नाव आह़े या लसीमुळे मत्स्यशेती करणाऱया शेतकरी व व्यावसायिकांचे नुकसान टाळता येणार आह़े

  नर्वस नेक्रोसिस हा विषाणू सर्वप्रथम गोब्रा या माशांमध्ये आढळून आला होत़ा हा विषाणू माशांची मज्जातंतूची मोठय़ा प्रमाणात हानी करत़ो हा विषाणू माशांच्या मज्जातंतूला मोठय़ा प्रमाणात जखमा करत असल्याने माशांचा मृत्यू होत़ो या विषाणूची बाधा माशांना दोन प्रकारे होत़े विषाणू अनुवांशिक असून माशांच्या अंडय़ामार्फत माशांच्या पिल्लांना होत़ो माशांच्या पैदास केंद्रावर अन्य सुढ असलेल्या माशांना या जन्मजात विषाणूची बाधा असलेल्या पिल्लांमुळे विषाणूची बाधा होत़े त्यामुळे मत्स्यशेती करणाऱया शेतकऱयांचे मोठे नुकसान होत होत़े मत्स्य पैदास केंद्रावर विकण्यात येणाऱया माशांच्या पिल्लांची वैज्ञानिक तपासणी करुन त्याबद्दलचा अहवाल देण्यात येत होत़ा मात्र या विषाणूबाबत ही प्रक्रिया लागू नसल्याने मोठय़ा प्रमाणात माशांची पिल्ले विकत घेणारे शेतकरी या विषाणूबाबत अनभिज्ञ होत़े शेतकऱयांनी विकत घेतलेली पिल्ले स्वतःच्या मत्स्य पैदास केंद्रावर नेत होत़े या संक्रमित पिल्लांमूळे सुदृढ मासेदेखील मोठय़ा प्रमाणात मृत होत असत.

  निमखाऱया पाण्यातील जिताडा, तांबोशी व ग्रे-मलेट आदी मत्सशेतीसाठी मोठी मागणी आह़े या मासळीला वाढ चांगली होते व भावही चांगला मिळतो. नोडॅव्हॅक-आर या लसीचा माशांच्या पिल्लांना डोस दिल्यास या विषाणूचे उच्चाटन होऊन शेतकऱयांचे नुकसान टाळता येणार आह़े याचा व्यापक वापर झाल्यास भविष्यात या विषाणूचा नायनाट होणेही शक्य आहे. आयसीएआरच्या दाव्यानुसार ही लस  सुरक्षित व कार्यक्षम असून नर्वस नेक्रोसिस व्हायरसने (व्हीएनएन) त्रस्त असलेल्या सर्व प्रजातींमध्ये ही लस वापरली जाऊ शकणार आह़े 

विषाणूचे उच्चाटन दृष्टीक्षेपात

व्हीएनएन विषाणू माशांचे मज्जातंतू संपवून टाकत़ो त्यामुळे माशांचा मृत्यू होत़ो यामध्ये मत्स्यपालन करणाऱयांचे मोठे नुकसान होत़े नोडॅव्हॅक-आर या नव्या  लसीमुळे बोटाएवढय़ा माशांच्या पिल्लांना ही लस देणे व या विषाणूचे उच्चाटन करणे शक्य होणार आह़े

 – प्ऱा ड़ॉ स्वप्नजा मोहिते,मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी

Related Stories

अन्यथा 30 मार्चनंतर राज्यात उग्र आंदोलन

Patil_p

खेडमध्ये एकाच रात्री चार फ्लॅट फोडले

Patil_p

रत्नागिरी : शेतकरी कायद्याच्या विरोधात दापोलीत सह्यांची मोहीम

triratna

‘गोष्ट एका कावळय़ाची’ला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार

Patil_p

व्याहाळी, नांदिवली नळपाणी योजना मंजूर, ग्रामस्थांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार

triratna

जिल्ह्य़ातील 87 उपकेंद्रातही होणार कोरोना लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!