तरुण भारत

‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्य़ात होणार क्षमता बांधणे

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण : 100 टक्के नळ जोडण्या असलेल्या 234 ग्रा.पं.नामार्गदर्शन

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

कोवीडच्या पार्श्वभूमिवर गावातील पाणी पुरवठा विषयक यंत्रणेची देखभाल दुरुस्ती तसेच पाणी गुणवत्ता विषयक कामाची खात्री करण्यासाठी कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांवर भागधारकांची क्षमता बांधणी होणार आहे. त्यासाठी जिह्यातील 100 टक्के वैयक्तीक नळ जोडण्या असलेल्या 234 ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकारी, महसुल गावनिहाय पाच महिला सदस्या यांचे ऑनलाईन क्षमता बांधणी प्रशिक्षण सर्व शासकीय नियमांचे पालन करून घेण्यात आले.

   जलजीवन मिशनमध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठयाचा प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार जिह्यातील 234 ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी, सदस्यांना पाणी पुरवठा योजनेची देखभाल-दुरुस्ती, पाणी गुणवत्ता यासह विविध मुद्यांवर स्वच्छता विभागाच्या संचालकांसह अन्य अधिकाऱयांनी दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला स्वच्छता विभागाचे संचालक राहुल साकोरे, अवर सचिव वसंत माने, उप व्यवस्थापक गणेश वाडेकर, डॉ. शैलेश कानडे उपस्थित होते. यावेळी युनिसेफ मुबंईचे मंदार साठे यांनी जल जीवन मिशनची रुपरेषा व कार्यपध्दती  विषयक मार्गदर्शन केले. कोविडच्या पार्श्वभूमिवर सतर्कता यावर श्रीमती अपर्णा कुलकर्णी यांनी माहिती दिली. जिल्हास्तरावरून कार्यकारी अभिंयता व्हि. सी. उपाध्ये, गोविंद भारव्दाज, टि. बी. जाधव, संदीप माने व अजय सावंत व ए. बी. मरभळ उपस्थित होते.

Related Stories

पालु गावातील ग्रामस्थांचा लांजा एस. टी. आगार प्रमुखांना घेराव

triratna

‘मिरगा’ची दरमदार एन्ट्री, बळीराजा सुखावला

Patil_p

मेडिकल कॉलेज निर्मितीसाठी प्रभारी अधिष्ठात्यांची नियुक्ती

Patil_p

रत्नागिरी : कोरोनामुक्त 6 महिन्याच्या बालकाला टाळयांच्या गजरात डिस्चार्ज

triratna

मुंबई-पुणे वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू

Patil_p

रत्नागिरी शहरात तीन लसीकरण केंद्रे

Omkar B
error: Content is protected !!