तरुण भारत

जिल्ह्य़ात 8 मे पर्यंत कोरोना लसीकरण सत्रे

ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांवर मिळणार लाभ : केविशील्ड फक्त फ्रन्टलाईन वर्कर, 45 वयोगटासाठी,कोव्हॅक्सीन फक्त 18 ते 44 वयोगटासाठी

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

जिल्हय़ात 6 मे ते 8 मे या तीन दिवसात काविशिल्डची 70 टक्के लस फ्रन्टलाईन वर्कर व 45 वर्षे वयोगटातील दुसऱया डोससाठी तर 30 टक्के लस  पहिल्या डोससाठी देण्यात येणार आहे. कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी दिली जाणार आहे.

जिल्ह्य़ात 6 मे ते 8 मे या कालावधीत कोवीड लसीकरण सत्र होणार आहे. केंद्र शासनाच्या प्राप्त लसीच्या कोटय़ातून 6 मे रोजी कोविशिल्ड लस साठय़ापैकी 70 टक्के लसी प्राधान्याने फ्रन्टलाईन वर्कर्स व 45 वयोगटातील दुसऱया डोससाठी तर 30 टक्के लस पहिल्या डोससाठी देण्यात आली आहे. 7 मे रोजी राज्य शासनाच्या प्राप्त कोटय़ातून कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करून देण्यात येणार आहे. लसीकरण करण्यासाठी येताना लाभार्थ्यांनी डबल मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टसींगचे पालन करावे व विनाकारण गर्दी करू नये असे सांगण्यात आले आहे.

6 मे ते 8 मे या कालावधीत यापूर्वी आयोजित कोविशिल्ड लसीकरणाची सत्रे वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ात लसीकरण सत्रे होणार आहेत. त्यामध्ये कोवीडशिल्ड (18 ते 44 वयोगट) फक्त ऑनलाईन पध्दतीने नोंदणीधारकांसाठी 6 मे रोजी ग्रामीण रुग्णालय राजापूर, मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी, जिवन शिक्षण मराठी शाळा 1 गुहागर व नगर परिषद दवाखाना चिपळूण, नगर परिषद दवाखाना खेड याठिकाणी लसीकरण सत्र ठिकाण पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होती. 6 मे रोजी काविशिल्ड (45 वयोगटातील व फ्रन्ट लाईन वर्कर्स) स्पॉट रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले होते.

7 मे रोजी कोव्हॅक्सीन लस (18 ते 44 वयोगट) फक्त ऑनलाईन पध्दतीने नोंदणी धारकांसाठी दिली जाणार आहे. त्यासाठी आयोजित सत्रात ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होणार आहे. शहरी भागामध्ये मंडणगड-नुतन हायस्कूल मंडणगड, दापोली-सोनी विद्यामंदीर, खेड-सहजिवन शाळा, गुहागर- पाटपन्हाळे शाळा, शृंगारतळी, चिपळूण-नागरी आरोग्य केंद्र व पोलीस हॉल चिपळूण, संगमेश्वर-ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर, रत्नागिरी नागरी दवाखाना कोकणनगर, पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी, लांजा हायस्कूल, राजापूर हायस्कूल येथे लसीकरण होणार आहे.

Related Stories

घातक रसायन ओतणारे दोन टँकर रंगेहाथ पकडले!

Omkar B

पारा घसरला, बागायतदार सुखावला

Patil_p

आरजीपीपीएल’ पाईपलाईनची दुरूस्ती सुरू

Patil_p

हातखंबा येथे ट्रक 35 फूट खोल नदीत कोसळल्याने दोघे जखमी

Patil_p

रत्नागिरीत औषध दुकानात कोरोनाचे रूग्ण

Patil_p

रत्नागिरी : पश्चिम किनारपट्टीवर १ हजारहून अधिक ट्रॉलर्सची घुसखोरी

triratna
error: Content is protected !!