तरुण भारत

‘मुन्नाभाई आयएएस’च्या अटकेत फेसबुकचा धागा

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांचे बनावट बदली पत्र तयार करणाऱया मुन्नाभाई आयएएस उर्फ अर्जुन संकपाळ याच्या अटकेत फेसबुकचा धागा मोलाचा ठरल़ा  बनावट पत्र तयार करताना अर्जुन याने आपले नाव पत्रात टाकले होत़े अर्जुन याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून त्याचे फेसबुक प्रोफाईल तपासण्यात आल़े  त्याच्या प्रोफाईलवर आयएएस अधिकाऱयांचे फोटो व व्हिडीओ असल्याने हेच फेसबुक अकाऊंट चालविणाऱया व्यक्तीचे कृत्य असल्याची खात्री पोलिसांना पटली    

Advertisements

  हाच धागा पकडत पोलिसांकडून आणखी माहिती या खात्याच्या माध्यमातून मिळविण्यात आल़ी नातेवाईक व मित्र परिवाराशी चर्चा केल्यानंतर अर्जुन हा राजापूर तालुक्यातील ओणी येथे असल्याचे समजताच पोलिसांकडून अर्जुन याच्या मुसक्या आवळण्यात आल्य़ा बदलीचे बनावट पत्र तयार करण्यामध्ये अर्जुन याचा अन्य सहकारी सहभागी असल्याची बाब तपासामध्ये समोर आल़ी त्यानुसार शहर पोलिसांकडून आणखी एकाला अटक करण्यात आली आह़े अक्षय आनंदा बुडके (28, ऱा करवीर कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आह़े बुधवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल़ी

कोल्हापूर येथील अर्जुन संकपाळ याने आपली बदली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागी झाली आह़े असे बनावट पत्र तयार केले होत़े यासाठी त्याने आपल्या मित्राची मदत घेतली होत़ी हे बनावट पत्र समोर येताच  जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली होत़ी या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होत़ी

पोलिसांच्या तपासामध्ये अर्जुन संकपाळ या 29 वर्षीय तरूणाने हा प्रकार केल्याचे समोर आले होत़े राजापूर तालुक्यातील ओणी येथून त्याला ताब्यात घेण्यात आल़े गावामध्ये आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले होत़े यासंबधी विश्वास बसावा यासाठी आपण हे बनावट पत्र तयार केल्याचे त्याने सांगितल़े याकामात अक्षय बुडके याने मदत कल्याचे अर्जुन याने सांगितले होत़े  

आयएएस अशी ओळख सांगितल्यानंतर अनेकांना गंडविण्याचा प्रयत्न अर्जुन याने केला होत़ा मात्र हळूहळू त्याचे पितळ उघडे पडू लागले होत़े नातेवाईक, मित्रपरिवार व गावातील मंडळी यांचा विश्वास बसावा यासाठी अर्जुन याने हे बनावट पत्र तयार करून नातेवाईक व इतरांना पाठविले होत़े मात्र नातेवाईकांनीच हे पत्र व्हायरल केल्याचे अर्जुन याचा बनाव समोर आल़ा

Related Stories

मोबाईल बॅटरीच्या उजेडात कागदपत्र तपासणी अन् शिक्के!

Patil_p

महाविकास आघाडीची विरोधकांकडून चुकीची प्रतिमा

Patil_p

कोकणवासियांसाठी गोकुळचे ताजे दूध

triratna

गणेशखिंडीत भातरोपांतून साकारला हत्ती!

Patil_p

सेल्फी काढताना पर्यटक पती, पत्नीचा हेदवी येथील बामणघळीत पडून मृत्यू

triratna

रत्नागिरी जिल्ह्यात आज 60 रुग्ण पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!