तरुण भारत

चीनकडून ऑस्ट्रेलियासोबतचे सर्व व्यापार करार स्थगित

बीजिंग : ऑस्ट्रेलियाची आक्रमक भूमिका आणि बेल्ट अँड रोड इनीशिएटिव्हचे (बीआरआय) दोन करार रद्द करण्यात आल्यावर चीनचा जळफळाट सुरू झाला आहे. चीनने आता ऑस्ट्रेलियाला धमकावत व्यापारी करारांशी संबंधित सर्व कार्ये अनिश्चित काळासाठी रोखल्या आहेत. सर्व व्यापारी चर्चाही स्थगित करत असल्याचे चीनने म्हटले आहे.  चीनने सध्या ऑस्ट्रेलियाकडून होणारी कोळसा, पोलाद, गहू, वाइनसमवेत अनेक सामग्रीची आयात बंद केली आहे. ऑस्ट्रेलिया शीतयुद्धाची मानसिकता आणि वैचारिक भेदभाव करत द्विपक्षीय संबंधांना नुकसान पोहोचवित असल्याचा आरोप करत चीनने हे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाने 2019 मध्येच कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे चीन-ऑस्ट्रेलिया संबंधांमध्ये तणाव आला होता. चीनने ऑस्ट्रेलियाकडून होणाऱया अनेक सामग्रींची आयात रोखली होती.

Related Stories

व्हॅलेंटाईन गिफ्ट, पतीला धक्का

Patil_p

स्पेनमध्ये हिंसाचार

Patil_p

पाकला दणका; सौदी अरेबियाने रोखला कच्च्या तेलाचा पुरवठा

datta jadhav

अफगान- काश्मीर कनेक्शन !

Patil_p

अर्थसंकल्पापूर्वी मोदींची 13 वी बैठक

Patil_p

न्यूझीलंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन, निवडणुका लांबणीवर

datta jadhav
error: Content is protected !!