तरुण भारत

ओशोंच्या वैयक्तिक सचिव कालवश

धर्मशाळा : ओशो निसर्ग हिमालय ध्यान केंद्राच्या संस्थापिका आणि ओशोंच्या वैयक्तिक सचिव राहिलेल्या योग नीलम यांचे धर्मशाळा येथे निधन झाले आहे. मागील काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. 1969 मध्ये लुधियाना येथे त्यांची ओशो यांच्याशी पहिली भेट झाली होती आणि त्यांनी 1972 मध्ये संन्यास घेतला होता. नोव्हेंबर 1985 मध्ये त्या ओशोंसोबत भारतात परतल्या. त्यांना भारतासाठी ओशोंच्या वैयक्तिक सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ओशो यांनी त्यांना इनर सर्कलचे सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते. 1990 मध्ये ओशो यांचे निधन झाल्यावर त्या पुणे कम्यून येथून काम करू लागल्या. 1996-99 पर्यंत युरोपमधील 8 देशांच्या दौऱयावर जात प्रमुख ध्यान कार्यक्रमात सामील झाल्या होत्या. 1999 मध्ये त्यांनी पुण्यातील कम्यून सोडली होती. त्या इनर सर्कलच्या (21 सदस्यांचा समूह) सदस्या होत्या. पुण्यातील ओशो कम्यून विभागले गेल्यावर 2000 साली नीलम आणि स्वामी आनंद तथागत यांनी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथील शिल्ला गावात ओशो निसर्ग हिमालय ध्यान केंद्र निर्माण केले. याकरता अभिनेता विनोद खन्ना यांनी मदत केली होती. विनोद खन्ना देखील ओशो यांचे शिष्य होते.

Related Stories

‘घरोघरी पिझ्झा पोहोचतो, तर रेशन का नाही’

Patil_p

लैंगिक छळ केल्यास होणार बोनस रद्द

Patil_p

पाँडिचेरीत आणखी दोन आमदारांचा राजीनामा

Patil_p

देशात चार महिन्यात दिले 18 कोटी डोस

Patil_p

स्वदेशी कोवॅक्सिनची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू

Patil_p

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

datta jadhav
error: Content is protected !!