तरुण भारत

रॅपिड टेस्टिंगसाठी इस्रायलच्या पथकाला पाचारण

मुकेश अंबानींनी सरकारकडे मागितली अनुमती ; कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढणार : लवकर निदान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी इस्रायलचे एक पथक भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष अनुमती मागितली आहे. इस्रायलचे एक पथक भारतात येऊन कोविड-19 इंफेक्शन सोल्युशनला इन्स्टॉल करणार आहे. या यंत्रणेमुळे भारतात कोरोना चाचणी अत्यंत सुलभपणे आणि जलद होऊ शकणार आहे. इस्रायलची कंपनी याकरता प्रशिक्षणही देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 15 दशलक्ष डॉलर्समध्ये इस्रायलच्या एका स्टार्टअपकडून ही यंत्रणा खरेदी केली आहे.

ब्रेथ ऑफ हेल्थ (बीओएच)  नावाच्या या स्टार्टअपच्या शिष्टमंडळाला रिलायन्सच्या अर्जामुळे आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कंपनी या रॅपिड टेस्टिंग सिस्टीमला त्वरित इन्स्टॉल करू इच्छित आहे. इस्रायलने स्वतःच्या नागरिकांवर 7 देशांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. यात भारतही सामील आहे.

सेकंदांमध्ये होणार निदान

इस्रायलच्या मेडिकल टेक्नॉलॉजी कंपनीचे तज्ञ रिलायन्सच्या पथकाला भारतात या सिस्टीमचा वापर कसा करावा, हे शिकविणार आहेत. कोरोना विषाणूचे वाहक आणि रुग्णांची ओळख पटविणारी ही यंत्रणा देशात संक्रमण कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकते. याच्या माध्यमातून कोरोना चाचणीचे निष्कर्ष सेकंदांमध्ये प्राप्त होऊ शकतात.

रिलायन्स समुहाचा करार

रिलायन्सने जानेवारीमध्ये बीओएचसोबत 15 दशलक्ष डॉलर्सचा एक करार केला  होता. याच्या माध्यमातून स्विफ्ट कोविड-19 ब्रेथ टेस्टिंग सिस्टीम मिळाली आहे. रिलायन्स इस्रायलच्या या कंपनीकडून शेकडो कोरोना टेस्ट किट्सची खरेदी करणार आहे. दर महिन्याला 10 लाख डॉलर्सच्या खर्चावर या रॅपिड टेस्टिंग यंत्राद्वारे लाखो लोकांची चाचणी करता येणार आहे.

95 टक्क्यांहून अधिक यशस्वी

बीओएचने श्वासाची चाचणी करणारी यंत्रणा तयार केली असून यात कोविड-19 संक्रमणाचा शोध लावण्याचा यशाचा दर 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. बीओएचच्या या यंत्रणेच्या वैद्यकीय परीक्षणात स्टँडर्ड पीसीआरच्या तुलनेत याचा यशाचा दर 98 टक्के असल्याचे आढळून आले आहे. इस्रायलच्या हदाश मेडिकल सेंटर आणि सेवा मेडिकल सेंटरमध्ये याचे परीक्षण करण्यात आले आहे. बीओएचची रॅपिड टेस्टिंग किट भारतात पोहोचली असून त्यांचे कामकाज सुरू झाल्यावर भारतात कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत मिळू शकते, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. इस्रायलचे उप आरोग्यमंत्री योव किश यांनी बीओएचच्या प्रयोगशाळेत जात या यंत्रणेशी संबंधित तयारींचा आढावा घेतला होता. भारतात आठवडय़ापूर्वी पोहोचलेल्या या यंत्रणेला लवकरच इन्स्टॉल केले जाणार आहे.

Related Stories

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला 51 ट्रान्सपोर्ट युनियनचा पाठिंबा

datta jadhav

‘ट्रॅक्टर रॅली’ हिंसाचारात 86 पोलीस जखमी; 15 FIR दाखल

datta jadhav

दिलासादायक : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1,386 रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

उत्तराखंड : देशातील भाविकांसाठी चारधाम यात्रा सुरू

pradnya p

गुजरात : अमरेली, राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

‘कोरोना’च्या सावटाखाली विधेयकांचा पाऊस

Patil_p
error: Content is protected !!