तरुण भारत

अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

राष्ट्रीय लोक दलाचे नेते-माजी केंद्रीय मंत्री

गुरुग्राम / वृत्तसंस्था

Advertisements

राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याने निधन झाले. निधनसमयी ते 82 वर्षांचे होते. अजित सिंह यांना 20 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालाअंती स्पष्ट झाले होते. अजित सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार जयंत चौधरी यांनी त्यांच्या निधनाची वार्ता दिली आहे.

फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. मंगळवारी रात्री त्यांना गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणीच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख असलेले अजित सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते होते. अजित सिंह हे देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचे सुपुत्र होते. उत्तर प्रदेशमधील बागपत लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल सातवेळा संसदेत निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी नागरी विमान उड्डाणमंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेत कॉम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षे नोकरी केली  होती. 1986 साली ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रीय लोक दलाची स्थापना केल्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणून कारभार पाहिला. मे 2003 पर्यंत त्यांचा पक्ष रालोआचा सहयोगी राहिला.

Related Stories

मुजफ्फरपूर : लैंगिक शोषण प्रकरणी 19 दोषी

Patil_p

मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंदा

Patil_p

देशात 24 तासांमध्ये 1463 नवे बाधित

Patil_p

पाच जवानांचा कोरोनावर ‘विजय’

Patil_p

पंजाब : आता खाजगी रुग्णालयांना मिळणार सरकारकडून प्लाझ्मा; पण…

pradnya p

डॉक्टरांचे ऐका, दोन मास्क घाला

Patil_p
error: Content is protected !!