तरुण भारत

काश्मीरमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचे आत्मसमर्पण

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्हय़ातील कनिगम भागात गुरुवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या संघर्षात तिघांना कंठस्नान घालण्यात आले असून एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. सदर दहशतवादी अल-बद्र या संघटनेचे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिह्यातील कनिगम भागात काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे मोहीम राबवत दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान या भागाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. दहशतवाद्यांना कारवाईची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या आत्मसमर्पण करण्याच्या विनंतीला अनुसरून तौसिफ अहमद नावाच्या दहशतवाद्याने शरणागती पत्करल्यामुळे त्याचे प्राण वाचले. तथापि, या संघर्षात अन्य तिघांना यमसदनी पाठविण्यात सुरक्षा दलाला यश आले.

या चकमकीपूर्वी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. सोपोरमधील नाथीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये लष्कराला आपला सुगावा लागताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत करण्यात आलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

Related Stories

देशातील कोरोना रूग्णसंख्या 20 लाखांवर

datta jadhav

मुंबईतील धक्कादायक घटना;अत्याचार करुन केले ‘हे’ अमानवी कृत्य

triratna

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याचा धोका

Patil_p

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच

Patil_p

मोरॅटोरियमवरून चपराक

Patil_p

रुग्णालयातून परतले डोनाल्ड ट्रम्प

Patil_p
error: Content is protected !!