तरुण भारत

चीनने गमाविले स्वतःच्या रॉकेटवरील नियंत्रण

कधीही कुठल्याही ठिकाणी कोसळण्याचा धोका

वृत्तसंस्था  / बीजिंग

Advertisements

चीनच्या अनियंत्रित रॉकेटने (प्रक्षेपक) जगभरात खळबळ उडविली आहे. चीनकडून अंतराळात पाठविण्यात आलेल्या या रॉकेटवर आता चीनचेच नियंत्रण राहिलेले नाही. हे रॉकेट कुठल्याही दिवशी पृथ्वीवर कोसळू शकते. याचदरम्यान अमेरिकेने या रॉकेट आणि अवशेषांबद्दल विधान केले आहे.

चीनचे हे रॉकेट शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करू शकते. रॉकेटला ट्रक करण्यात येत असून यासंबंधी सातत्याने माहिती दिली जाणार असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. हे रॉकेट 100 फूट लांबीचे आणि 16 फूट रुंदीचे आहे.

सद्यस्थितीत या उपग्रहाचा मार्ग न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंगपासून उत्तरेच्या दिशेला आणि चिली-न्युझीलंडच्या दिशेने आहे. या भूकक्षेत हे रॉकेट कुठेही कोसळू शकते असे उद्गार हॉवर्डमधील खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांनी काढले आहेत. पृथ्वीच्या नजीक आल्यावर या चिनी रॉकेटचा बराचसा हिस्सा जळून जाईल, पण याचे अवशेष पृथ्वीवर कुठेही पडू शकतात. हे चिनी रॉकेट 4 मैल प्रति सेकंदांच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे.

चीनच्या या रॉकेटचे नाव लाँग मार्च 5बी वाय2 आहे. सध्या हा रॉकेट पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चीनने 28 एप्रिल रोजी स्वतःचे तियानहे अंतराळ स्थानक निर्माण करण्यासाठी स्वतःचे सर्वात मोठे रॉकेट प्रक्षेपित केले होता. हे रॉकेट एक मॉडय़ूलसह अंतराळ स्थानकापर्यंत गेले होत. मॉडय़ूलला निर्धारित कक्षेत सोडल्यावर याला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर परतायचे होते. पण चीनच्या अंतराळ संस्थेने आता यावरील नियंत्रण गमाविले आहे. तेव्हापासून जगभरातील अंतराळ संशोधक या विचित्र घटनेवर नजर ठेवून आहेत.

याचबरोबर विविध देशांचे रडार देखील या रॉकेटवर नजर ठेवून आहेत. याचा वेग आणि सातत्याने बदलणाऱया उंचीमुळे ते सध्या कुठे आहे हे समजून घेणे अवघड ठरत आहे. रॉकेटचा किती हिस्सा पृथ्वीवर येणार हे सांगणे सध्या कठीण आहे, कारण आम्ही याच्या डिझाईनविषयी काहीच जाणवत नसल्याचे उद्गार युरोपीय अंतराळ संस्थेचे सुरक्षा कार्यक्रम प्रमुख होल्गर क्राग यांनी काढले आहेत.

मागील 3 दशकांमध्ये आतापर्यंत इतकी अवजड वस्तू अंतराळातून पृथ्वीवर कोसळलेली नाही. यापूर्वी 1991 मध्ये 43 टन वजनाचा सोव्हियत स्पेस स्टेशनचा सॅल्यूट-7 पृथ्वीवर अनियंत्रित पद्धतीने कोसळला होता. यामुळे अर्जेंटीनात मोठे नुकसान झाले होते.

मे 2020 मध्ये देखील चीनने असाच एक रॉकेट अंतराळात पाठविला होता, त्यानेही पृथ्वीवर अनियंत्रित पद्धतीने प्रवेश करत पश्चिम आफ्रिकेच्या कोटे डि इवॉयर या गावात कोसळला होता. या घटनेनंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या प्रमुखांनी चीनवर प्रखर टीका केली होती. चीन स्वतःचे अंतराळ स्थानक उभारत आहे. या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी चीनला अद्याप 11 वेळा रॉकेट पाठवावे लागणार आहेत.

Related Stories

फ्रान्समध्ये सार्वजनिक स्थळी मास्क अनिवार्य

Patil_p

काहीच करत नसताना 14 कोटींचा भत्ता का घेऊ?

Amit Kulkarni

मॉस्कोत 3,666 बळी

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या तीन लाखांसमीप

datta jadhav

न्यूयॉर्कमध्ये आता दिवाळीची सुटी

Patil_p

चिनी कंपनीकडून अमेरिकेची फसवणूक

datta jadhav
error: Content is protected !!