तरुण भारत

रशियात सिंगल डोस लसीला मंजुरी

स्पुतनिक लाइटचा एकच डोस 80 टक्क्यांपर्यंत प्रभावी : 730 रुपयांपेक्षा कमी असणार किंमत

वृत्तसंस्था  / मॉस्को

Advertisements

रशियाने कोरोनावरील सिंगल डोस लस विकसित करण्यास यश मिळविले आहे. या लसीचे नाव स्पुतनिक लाइट असून ती 79.4 टक्के प्रभावोत्पादक आहे. ही स्पुतनिक वर्गातील नवी लस असून याचा वापर युरोप आणि अमेरिका वगळता जगातील 60 देशांमध्ये वापर होत आहे. भारतानेही ‘स्पुतनिक-व्ही’ला मंजुरी दिली आहे. 1 मे रोजी याची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. स्पुतनिक लाइट या सिंगल शॉट लाइट लसीला आगामी काळात देशात मंजुरी मिळू शकते.

स्पुतनिक लाइटची निर्मिती मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिटय़ूटने केली आहे. स्पुतनिक-व्ही प्रमाणेच याकरता देखील रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीएफआय)ने वित्तसहाय्य केले आहे. आरडीएफआयचे सीईओ किरिल दिमित्रिएव यांनी जगभरातील याची किंमत 10 डॉलर्सपेक्षा (सुमारे 730 रुपये) कमी राहणार असल्याचे म्हटले आहे.

या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीत 7 हजार लोकांना सामील करण्यात आले आहे. ही चाचणी रशिया, संयुक्त अरब अमिरात आणि घाना येथे पार पडली आहे. 28 दिवसांनी याच्या डाटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. ही लस विषाणूच्या सर्व नव्या स्ट्रेनवर प्रभावी आहे. ही अनेक अन्य डबल डोस लसींपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

स्पुतनिक लाइटचे लाभ..

याची संपूर्ण प्रभावोत्पादकता 79.4 टक्के आहे. लस टोचून घेतल्यावर 100 टक्के लोकांमध्ये 10 दिवसांनीच अँटीबॉडीज 40 पट वाढल्या आहेत.लस घेतलेल्या सर्व लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या एस-प्रोटीनच्या विरोधात इम्यून रिस्पॉन्स विकसित झाली आहे.ही लस सिंगल डोस असल्याने मोठी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविता येणार आहे.स्पुतनिक लाइटला 2 ते 8 अंश तापमानातही ठेवले जाऊ शकते, यामुळे याची वाहतूक सुलभपणे करता येणार आहे.पूर्वी कोरोना संक्रमण झालेल्या लोकांमध्येही ही लस प्रभावोत्पादक आहे.लस घेतल्यावर कोरोनाच्या गंभीर परिणामाचा धोका कमी होईल. बहुतांश प्रकरणांमध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागणार नाही.

Related Stories

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

datta jadhav

कोरोना विषाणू संक्रमणाचा मेंदूवर प्रभाव

Patil_p

खरेदीसाठीही आता सम-विषय फॉर्म्युला

Patil_p

‘गुगल मॅप्स’च्या नादात घोळ

Patil_p

अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर

datta jadhav

सौदी अरेबिया : सात महिन्यानंतर मक्का भाविकांसाठी खुली

datta jadhav
error: Content is protected !!