तरुण भारत

वेदा कृष्णमूर्तीला पंधरवडय़ात दोन धक्के

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीला दोन आठवडय़ांच्या कालावधीत कोरोनामुळे दोन जबरदस्त कौटुबिक धक्क्यांना सामोरे जावे लागले. वेदाने पंधरवडय़ांच्या कालावधीत आपल्या आईला आणि बहिणीला गमवले आहेत.

Advertisements

बेंगळूरच्या वेदा कृष्णमूर्तीची आई चेलूवंबादेवी यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले होते. 24 एप्रिल रोजी वेदाच्या आईला कोरोनाने हिरावून घेतले होते. तर चिक्कमंगळूरमध्ये राहणारी वेदाची बहिण 45 वर्षीय वत्सला शिवकुमार हिचे बुधवारी रात्री एका खासगी रूग्णालयात कोरोनाने निधन झाले. वेदा कृष्णमूर्तीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 48 वनडे आणि 76 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आपण स्वतः कोरोना चाचणी केली आणि त्यामध्ये आपण निगेटिव्ह असल्याचे वेदाने सांगितले. कर्नाटकामध्ये ऑक्सिजनचा तसेच महत्त्वाच्या औषधांचा आणि कोरोना लसीचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत असल्याने राज्यातील कोरोना स्थिती अधिक चिंताजनक असल्याचे वेदा कृष्णमूर्तीने म्हटले आहे. 

Related Stories

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर शिक्कामोर्तब

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या टायची आयपीएल स्पर्धेतून माघार

Patil_p

हालँड गोल्डन बॉय पुरस्कार विजेता

Omkar B

बोपण्णा-शेपोव्हॅलोव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

मारिनच्या माघारीमुळे सिंधूसह 4 दावेदारांच्या आशा पल्लवित

Patil_p

गोव्याला हरवून गुजरातचा दुसरा विजय

Patil_p
error: Content is protected !!