तरुण भारत

रियल माद्रीदला हरवून चेल्सी अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / लंडन

इंग्लीश लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात चेल्सीने रियल माद्रीदचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत मँचेस्टर सिटी आणि चेल्सी या इंग्लीश चॅम्पियन्स संघामध्ये जेतेपदासाठी लढत होईल.

Advertisements

बुधवारी स्टॅमफोर्ड ब्रिज येथे झालेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात चेल्सीने रियल माद्रीदचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. चेल्सीने रियल माद्रीदवर सरासरी 3-1 अशा गोलफरकाने मात करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. बुधवारच्या सामन्यात चेल्सी संघातर्फे टिमो वेमर आणि मॅसन माऊंट यांनी प्रत्येकी एक गोल केला.  या सामन्यात  28 व्या मिनिटाला चेल्सीचे खाते वेमरने हेडरद्वारे गोल करून उघडले. त्यानंतर माऊंटने 85 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून रियल माद्रीदचे आव्हान  संपुष्टात आणले. आता 29 मे रोजी इस्तुंबलमध्ये चेल्सी आणि मँचेस्टर सिटी यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 2012 साली चेल्सीने ही स्पर्धा केवळ एकदाच जिंकल्यानंतर ते आता पहिल्यांदा अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत.

Related Stories

ड्रेसेल, पीटी यांचे नवे विश्वविक्रम

Omkar B

क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेत मरे, इव्हान्स खेळणार

Patil_p

भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून 14 दिवस क्वारंटाईन

Patil_p

इंग्लंड-भारत डे-नाईट कसोटी अहमदाबादमध्ये

Patil_p

निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मुंबई अंतिम फेरीत, विक्रमासह शॉचे आणखी एक शतक

Amit Kulkarni
error: Content is protected !!