तरुण भारत

थिएम उपांत्यपूर्व फेरीत, नदाल शेवटच्या 16 खेळाडूंत

वृत्तसंस्था / माद्रीद

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत गुरूवारी ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरचा पराभव केला. त्याचप्रमाणे कझाकस्तानच्या बुबलीकने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविताना रशियाच्या कॅरेटसेव्हवर मात केली. स्पेनच्या नदालने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisements

गुरूवारी झालेल्या सामन्यात थिएमने ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरचा 7-6 (9-7), 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात कझाकस्तानच्या बुबलीकने रशियाच्या कॅरेटसेव्हवर 6-4, 6-3 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. स्पेनच्या राफेल नदालने बुधवारच्या सामन्यात आपल्याच देशाच्या कार्लोस अलकॅरेझचा 6-1, 6-2 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. नदालला विजयासाठी 80 मिनिटे झगडावे लागले. अन्य एका सामन्यात रशियाच्या मेदव्हेदेवने फोकिनाचा 4-6, 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. एप्रिलच्या पूर्वार्धात मेदव्हेदेवला कोरोनाची बाधा झाली होती. स्पेनच्या नदालने आतापर्यंत सहावेळा माद्रीद टेनिस स्पर्धा जिंकली आहे. जर्मनीच्या पाचव्या मानांकित ऍलेक्झांडर व्हेरेव्हने जपानच्या निशीकोरीचा 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

पाकचा क्रिकेटपटू खुशदील शहा जखमी

Patil_p

कर्णधार स्टीव्ह स्मिथला दंड

Patil_p

संजिता चानूवरील उत्तेजक सेवनाचे आरोप मागे

Patil_p

विंडीजचे माजी क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स कालवश

Patil_p

मल्ल सुमित मलिकला दुखापत

Patil_p

लंकेचा 169 धावांत खुर्दा, होल्डरचे पाच बळी

Patil_p
error: Content is protected !!