तरुण भारत

नेमबाज अपूर्वी चंडेलाला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था / बेंगळूर

भारताच्या ऑलिंपिक नेमबाज संघातील रायफल नेमबाज अपूर्वी चंडेलाला कोरोनाची बाधा झाल्याने झाग्रेब येथे होणाऱया युरोपियन चॅम्पियन्सशीप नेमबाजी स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय नेमबाज संघामध्ये खळबळ माजली आहे.

Advertisements

भारतीय नेमबाजांना ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी तीन महिन्यांच्या कालावधीकरिता क्रोएशियातील झाग्रेब येथे पाठविण्यात येणार असून या नेमबाजांना तेथे सरावाची व्यवस्था करण्यात आली आहे. अपूर्वी चंडेलाला कोरोनाची बाधा झाल्याने आता तिला भारतीय नेमबाज संघाबरोबर क्रोएशियाला पाठविण्याची शक्यता दुरावली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज संघासाठी आयोजिलेल्या सराव योजनांना या घटनेने धक्का फटका बसला असून भारताचे राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक जसपाल राणा, रोनक पंडित आणि समरेश जंग हे काही वैयक्तिक कारणास्तव या सराव शिबिराला उपस्थित राहणार नाहीत.

Related Stories

आयसीसीकडूनही गंभीर दखल, घटनेचा तीव्र निषेध

Patil_p

सिग्नेचर स्टाईल… युसेन बोल्ट…अन् आरसीबीला पाठिंबा!

Amit Kulkarni

बोल्ट, मिल्ने, नीशमचे चेन्नईत आगमन

Patil_p

कोरोनाबाधित मिल्खा सिंग इस्पितळात

Patil_p

बेळगावचा विवेक कापाडिया राष्ट्रीय रेस स्पर्धेत उपविजेता

Omkar B

आयपीएलला आजपासून प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!