तरुण भारत

महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी बाबर आझम, फक्र झमान यांची शिफारस

वृत्तसंस्था / दुबई

आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली जाते. एप्रिल महिन्यासाठी आयसीसीच्या या सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्काराकरिता पीसीबीने पाकचे बाबर आझम आणि फक्र झमान यांच्या नावांची शिफारस केली आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत विविध देशांच्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेवून आयसीसीतर्फे सर्वोत्तम महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंची निवड केली जाते. दरम्यान क्रिकेटच्या सर्वप्रकारातील कामगिरीची यावेळी दखल घेतली जाते. एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरूद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकामध्ये पाकच्या बाबर आझम आणि फक्र झमान यांची कामगिरी दर्जेदार झाली आहे. पुरूष विभागासाठी नेपाळचा फलंदाज कुशल भुरतेल याच्या नांवाची शिफारस नेपाळच्या क्रिकेट संघटनेने केली आहे. महिलांच्या विभागात ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिली आणि मघन स्कूट, न्यूझीलंडची कॅस्पेनेक यांची शिफारस करण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

विमान दुर्घटनेत चार फुटबॉलपटू ठार

Patil_p

हार्दिक पंडय़ाकडून भरीव योगदानाची अपेक्षा ः रोहित

Patil_p

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

Patil_p

नागलची सलामीची लढत बेरानकिसविरुद्ध

Patil_p

फॉर्म कायम राखणे आव्हानात्मक असेल

Patil_p
error: Content is protected !!