तरुण भारत

सत्यवर्त, सुमित उपांत्यपूर्व फेरीत, धनकर पराभूत

वृत्तसंस्था / सोफिया, बल्गेरिया

सत्यवर्त कादियन व सुमित मलिक यांनी वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत आपापल्या गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठत भारताचे आव्हान जिवंत ठेवले. मात्र अमित धनकरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisements

74 किलो वजन गटाच्या लढतीत धनकरला मॉल्डोव्हाच्या मिहाइल सावाने 9-6 अशा गुणांनी हरविले. 0-4 असे पिछाडीवर पडल्यानंतर धनकरने जोरदार मुसंडी मारली होती. पण सावाने त्याला पूर्ण यश मिळू दिले नाही. धनकरच्या पराभवामुळे आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजन गटात भारताचा एकही मल्ल प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. सत्यवर्त (97 किलो) व सुमित मलिक (125 किलो) या दोघांना अजूनही संधी आहे.

सत्यवर्तने प्युर्टो रिकोच्या इव्हान अमाडूर रॅमोसवर 5-2 अशा गुणांनी विजय मिळविला. पहिल्या सत्रात सत्यवर्तने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण रॅमोसने त्याला खाली घेतल्यानंतर तो अडचणीत आला होता. नंतर सत्यवर्तने दोन गुण मिळवित विजय साकार केला. 125 किलो वजन गटाच्या लढतीत किर्गीझस्तानच्या आयाल लाझारेव्हविरुद्ध सुमित शेवटच्या 25 सेकंदापर्यंत 1-2 असा पिछाडीवर पडला होता. पण शेवटच्या क्षणाला त्याला पुशआऊटचा गुण मिळाला आणि 2-2 अशी बरोबरी झाली. पण सरसतेच्या निकषावर सुमितला विजयी घोषित करण्यात आले. त्याची पुढील लढत मॉल्डोव्हाच्या अलेक्झांडर रोमानोव्हविरुद्ध झाली. त्यात तो 0-1 असा पिछाडीवर पडला होता. हालचाल न केल्याबद्दल त्याला हा दंड करण्यात आला होता. दुसऱया सत्रातही प्रतिस्पर्ध्याने त्याला पुशआऊट केल्याने त्याने आणखी एक गुण गमविला. पण अखेरच्या क्षणांत आक्रमक खेळण्याचे डावपेच वापरत त्याने थ्रो करीत दोन गुण मिळविले आणि बरोबरी साधली. शेवटी त्याने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकत आगेकूच केली.

Related Stories

मानांकन यादीत बेलारूसची साबालेन्का सातव्या स्थानी

Patil_p

ओसाकाचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त

Patil_p

आयव्हरी कोस्टच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

Patil_p

युक्रेनची स्विटोलिना विजेती

Patil_p

हॉकी इंडियातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण

Patil_p

केन विल्यम्सन हैदराबादचा नवा कर्णधार

Patil_p
error: Content is protected !!