तरुण भारत

‘ओला’ची इलेक्ट्रीक स्कूटर आंतरराष्ट्रीय बाजारात

फ्रान्स, इटली, जर्मनीत पाठवणार स्कूटर ; भारतातील स्कूटरच्या दराबाबत संभ्रमच

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

इलेक्ट्रीक स्कूटर्सच्या निर्मितीमध्ये लक्ष घालणाऱया ओला इलेक्ट्रीकने आपल्या स्कूटरच्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही स्थान मिळवून देण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भातली तयारी कंपनीने पूर्ण केली आहे.

फ्रान्स, इटली आणि जर्मनीसारख्या प्रगत देशांमध्ये चालू आर्थिक वर्षातच स्कूटर्सच्या निर्यातीवर भर दिला जाणार असल्याचे कंपनीने ठरवले आहे. तेथील बाजारपेठांमध्ये ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर सादर करून व्यवसाय विस्तार करण्यावर आगामी काळामध्ये भर दिला जाणार आहे. कंपनी याच वषी भारतामध्ये जुलैमध्ये आपली इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात दाखल करणार आहे. यासंदर्भातल्या तयारीलाही कंपनीने वेग दिला असल्याचे समजते. हायपर चार्जर नेटवर्क स्थापन करण्यासाठी कंपनीने वेगाने पावले उचलली आहेत.

चालू आर्थिक वर्षातच दुचाकी पाठवणार

चालू आर्थिक वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ओलाचे सीईओ व चेअरमन भावेश अग्रवाल यांनी नुकतेच सांगितले. असं असलं तरी सध्याला भारतात दुचाकी सादरीकरणासाठी जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.

किंमतीबाबत स्पष्टता नाही

कंपनीने आपल्या नव्या दुचाकीच्या किमतीबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे अद्यापही या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

या देशात होणार निर्यात कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटर्सची विक्री युरोपसारख्या प्रगत देशामध्येही केली जाणार आहे. याव्यतिरिक्त फ्रान्स, इटली, जर्मनी या देशामध्येही इलेक्ट्रीक स्कूटर सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इंग्लंड हा देश तसेच स्पेन या देशातही इलेक्ट्रीक स्कूटरला चांगली मागणी होऊ शकते असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीवरदेखील कंपनीचे लक्ष असणार आहे. भविष्यात कार निर्मितीचाही विचार असल्याचे कंपनीने नुकतेच म्हटले आहे.

Related Stories

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

Omkar B

नवी इकोस्पोर्ट एसई दाखल

Amit Kulkarni

व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केला कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर 

prashant_c

ट्रीम्पची ‘बोनविले बॉबर’ मोटारसायकल बाजारात

Patil_p

बीएमडब्ल्यूच्या दोन बाईक्स दाखल

Patil_p

दोन अंकी विकासाची ‘हय़ुंडाई’ला आशा

Patil_p
error: Content is protected !!