तरुण भारत

स्विगीच्या कर्मचाऱयांना कामामध्ये सवलत

आठवडय़ाचे 4 दिवसच करावे लागणार काम

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाचा वाढता प्रभाव सर्वत्र दिसत असून कर्मचाऱयांना याचा सर्वाधिक धोका पोहोचत आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱया स्विगी कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना कामामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्विगी कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना आता 4 दिवस काम करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना आठवडय़ातील 3 दिवस घरी आराम करता येणार आहे. सदरचा निर्णय हा अलीकडच्या काही दिवसांमध्ये झालेल्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचे स्विगीच्या सूत्रांनी सांगितले. कंपनीचे एचआर विभागाचे मुख्य गिरीश मेनन यांनी सांगितले की, स्विगीचे कर्मचारी सध्या ग्राहकांना आवश्यक ते खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या काळातही धोका पत्करून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी धडपडताना दिसत आहेत.  सध्याला खाद्यपदार्थांसह इतर गोष्टीही ऑनलाइन मागवल्या जात असल्याने पुरवठा करणाऱया कर्मचाऱयांवर ताण जाणवतो आहे. सध्याचा कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने कर्मचाऱयांना आठवडय़ाचे 4 दिवस काम करण्याची संधी दिली आहे.

Related Stories

बालाजी वेफर्सचा नवा प्रकल्प

Patil_p

जेफ बेजोसच्या संपत्तीत वाढ

Patil_p

नवसंकल्पना क्षेत्रातील भारताची भरारी

Omkar B

जनधन योजनेच्या खात्यांची संख्या 40 कोटींच्या घरात

Patil_p

सहा वर्षांमध्ये 37 कोटी एलईडी बल्बचे वितरण

Omkar B

इ-वे बिलाचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला

Patil_p
error: Content is protected !!