तरुण भारत

काही चांगलही घडतंय…

अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार दि 7 मे सकाळी 9.00

वर्ये येथील आनंद क्लिनिक रुग्णांसाठी ठरतेय ‘आनंदवन’

Advertisements

● कोरोना काळात डॉ. श्वेता कदम-घोरपडे गरिबांसाठी आधारवड ● गरीब-गरजुंना मोफत सेवा  

गौरी आवळे / सातारा :

कोरोना हे नाव ऐकल्यावर भल्याभल्यांना घाम फुटत आहे. कोरोनाच्या धास्तीने माणूसकी संपली का ? असे वाटत आहे. उपचारासाठी रूग्णांना वणवण फिरावे लागत आहे. अशा कठीण काळातही रूग्णासाठी डॉ. श्वेता कदम-घोरपडे या खंबीरपणे उभ्या आहेत. वर्ये येथील त्यांच्या आनंद क्लिनिकमध्ये उपचारासाठी शहरासह ग्रामीण भागातील रूग्ण येतात. गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा देण्यास त्या प्राधान्य देत आहेत.  

कष्ट, संघर्ष आणि जीवनाचा खडतर प्रवास करून डॉ. श्वेता कदम-घोरपडे  यांनी बी. एच. एम. एस शिक्षण पूर्ण केले. दोन मुले, पती, आणि सासरची जबाबदारी खांद्यावर आहे. यासोबत रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास त्यांनी समोर ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्ये येथे त्यांचे आनंद क्लिनिक आहे. क्लिनिकमध्ये दररोज पेंशटच्या रांगा लागत आहेत. वर्ये, रामनगर, पानमळवाडी, धावडशी, नेले, किडगाव येथून रूग्ण मोठय़ा संख्येने उपचारासाठी येतात.

गतवर्षी संपूर्ण देशात दाखल झालेल्या कोरोनाने थैमान घातले. या काळात अनेक डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले. रूग्णांवर उपचारासाठी नकार दिला. मात्र कोरोना काळातही डॉ. श्वेता कदम-घोरपडे यांनी दवाखाना सुरू ठेवला. दवाखान्यात येणाऱया सर्वच रूग्णांवर त्या उपचार करत आहेत. काही गरीब, गरजू रूग्ण येतात. या रूग्णांकडून त्या पैसे घेत नाहीत. त्यांचा मोफत उपचार करतात. त्यांच्या या मोफत उपचारामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास स्वत: रूग्णांना कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे यांचे मार्गदर्शन नातेवाईकांना करत आहेत. डॉक्टरांना फोन करून रूग्णांना विशेष सेवा देवून योग्य उपचार देण्याची मागणी करत आहेत. त्यांचा स्वभाव शांत, संयमी आहे. ग्रामीण भागातून येणाऱया तरूणी, महिला वयोवृद्ध रूग्णंना त्या नेहमी आपुलकीची वागणूक देतात.  

चला मदतीचा हात देऊया…

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना मला पती डॉ. महेश कदम यांची मोलाची साथ मिळते. यामुळे अनेक संकटाचा सामना करणे सहज शक्य होते. आज कोरोना सारखे मोठे संकट जरी आले असले तरी त्यावर मात करण्यासाठी आपण एकजुटीने लढण्याची गरज आहे. या कठीण काळात मी आणि माझे पती आम्ही रूग्णांना सेवा देण्यास नेहमी तत्पर राहणार आहे.  डॉ. श्वेता कदम-घोरपडे, आनंद क्लिनिक, वर्ये सातारा.

Related Stories

साताऱ्यात प्रभू रामांचे नाव चक्क चपातीवर

datta jadhav

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

Patil_p

सातारा : खूनप्रकरणी फलटणच्या एकास जन्मठेप

triratna

राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय : जिल्हा परिषद खर्चाचे अधिकार सीईओंकडे

Shankar_P

सातारा जिल्ह्यात मृत्यूचे तांडव; 41 जणांचा मृत्यू

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 76 नागरिकांना आज डिस्चार्ज; 404 नमुने पाठविले तपासणीला

Shankar_P
error: Content is protected !!