तरुण भारत

तामिळनाडू : एम के स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ!

ऑनलाईन टीम / चेन्नई : 


तामिळनाडूमध्ये द्रमुक मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी आज ( 7 मे) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना शपथ दिली. यावेळी स्टॅलिन यांच्यासोबत इतर 33 मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ नेते दुरईमुरुगम यांच्या सह 12 नवीन  चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.

Advertisements

 
माजी मंत्री तसेच द्रमुक महासचिव दुरईमुरुगन यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 


स्टॅलिन यांच्या सरकारमध्ये पी के सेकर बाबू, एस एम नसर, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, द्रमूकचे माजी सल्लागार आर सखापानी, पी मूर्ती, आर गांधी, एस एस शिवशंकर, पलानीले त्यागराजन, अनबिल महेश मोय्यामोजी, शिवा व्ही मयनाथन, सी व्ही गणेशन आणि टी मनो थांगराज यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात दोन महिला प्रतिनिधींचाही समावेश आहे. यामध्ये गीता जीव आणि एन कयालविजी सेल्वराज यांना संधी मिळाली आहे.


मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे सार्वजनिक सामान्य प्रशासन, आयएएस, आयपीएस तसंच अखिल भारतीय सेवा, जिल्हा राजस्व अधिकारी, पोलीस, गृह, विशेष प्रोत्साहन, विशेष कार्यक्रम कार्यान्वयन आणि इतर विभाग असणार आहेत.


द्रमुकची तब्बल 10 वर्षानंतर राज्यात सत्ता स्थापना झाली आहे. द्रमुकने राज्यात सहाव्या वेळेस सत्ता स्थापना केली आहे. महत्वाचे म्हणजे, 2006 ते 2011 या दरम्यान डीएमके पक्षाची ज्या वेळी सत्ता होती त्यावेळी करुनानिधी मुख्यमंत्री होते आणि स्टॅलीन त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता स्टॅलिन पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. 

Related Stories

संयुक्त राष्ट्राच्या गाडीत सेक्स, व्हिडिओ व्हायरल

datta jadhav

कोरोनाच्या ‘तबलीग’ रूग्णांची संख्या हजारावर

Patil_p

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याच्या वक्तव्यावर राजेश टोपे म्हणाले, शब्दाचा विपर्यास करू नये ..

triratna

ब्राझीलमध्ये 24 तासात 55 हजार नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

देशात 80 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

राज्यात लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय -आरोग्यमंत्री राजेश टोपे

triratna
error: Content is protected !!