तरुण भारत

सुवर्णसौधमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करा

खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वार्ताहर / खानापूर

Advertisements

संपूर्ण कर्नाटकात कोरोना महामारीने कहर गाठला आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले असून बेळगाव जिल्हय़ासह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णांची दररोज उच्चांकी नोंद होत आहे. ही चिंताजनक बाब असून अधिकाधिक उपचारासाठी बेळगाव येथे भव्य असे कोविड केअर सेंटर सुरू करावे. जिल्हय़ातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची तुडुंब गर्दी झाली आहे. बेड नसल्यामुळे अनेकांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आता बेळगाव येथे कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या सुवर्णसौधमध्ये कोविड केअर सेंटर उभारून बेळगावसह उत्तर कर्नाटकातील नागरिकांच्या उपचाराची सोय करावी, अशी मागणी खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री बी. एस येडियुराप्पा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

  बेळगाव जिल्हय़ात दररोज हजारच्या घरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी तब्बल 956 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे. गुरुवारीदेखील रुग्णांमध्ये बरीच वाढ झाली आहे. हा वाढता आकडा लक्षात घेता आता अशा गंभीर परिस्थितीत बेळगाव जिल्हय़ाच्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून काहीही वापर न करता खाली असलेले सुवर्णसौध आता गंभीर परिस्थितीच्या काळात कोविड केअर सेंटर म्हणून निर्माण करावे, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.  जिल्हय़ासह उत्तर कर्नाटकात रुग्णांची संख्या वाढत आहे. बेळगाव जिल्हय़ातील अनेक तालुक्मयांमध्ये सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा किंवा बेडची व्यवस्था नसल्याने अनेकांना याचा त्रास होत आहे. वास्तविक, बिम्स हे गोरगरिबांसाठी लाभदायी असते पण अशा गंभीर काळामध्ये अनेकांना याचा मोठा फटका बसत आहे. गरिबांसाठी असलेले सिव्हिल हॉस्पिटल कुचकामी ठरत आहे. अनेकांना बेड मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने बेळगावात सुवर्णसौधमध्येच कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

घरे कोसळलेल्या योग्य कुटुंबांनाच नुकसान भरपाई द्या

Patil_p

थोरल्याचा मृत्यू..धाकटय़ानेही सोडला प्राण

Patil_p

आई पॉझिटिव्ह, मुलगी निगेटिव्ह

Patil_p

छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता

Amit Kulkarni

राज इलेव्हन, नरवीर, डीबी स्पोर्ट्स, अल रजा विजयी

Amit Kulkarni

शनिवारी जिल्हय़ात 57 कोरोनाबाधित

Patil_p
error: Content is protected !!