तरुण भारत

देशात कोरोना घेतोय ताशी 150 बळी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

देशात कोरोना संक्रमणाच्या वेगाबरोबरच मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात देशात 4 लाख 14 हजार 188 कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली. काल दिवसभरात 3 लाख 31 हजार 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 3927 रुग्णांचा मृत्यू झाला. मागील 10 दिवसात देशात कोरोनाने 36 हजार 110 बळी घेतले असून, त्याची ताशी सरासरी 150 इतकी आहे.

Advertisements

देशात आतापर्यंत 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 76 लाख 12 हजार 351 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 36 लाख 45 हजार 164 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 34 हजार 083 रुग्ण दगावले आहेत. 

आतापर्यंत 16 कोटी 49 लाख 73 हजार 058 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Related Stories

तेजसनंतर मिग-29, सुखोईमुळे बळ वाढणार

Patil_p

स्वस्त पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे आश्वासन

Patil_p

गरिबांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य द्या : सोनिया गांधींचे पंतप्रधनांना पत्र 

prashant_c

मोदी-ममता दोघेही निशाण्यावर

Patil_p

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; एक जवान शहीद

datta jadhav

कायद्यातील बदलांचा शेतकऱयांनाच फायदा

Patil_p
error: Content is protected !!