तरुण भारत

मांडवे येथे ढगफुटी; ओढे-नाले भरून वाहिले

गारांमुळे आंब्याच्या बागांचेही नुकसान; घरा-घरात घुसले ओढ्याचे पाणी  

प्रतिनिधी / नागठाणे :  

Advertisements

मांडवे (ता.सातारा) येथे गुरुवारी दुपारी ढगफुटी झाली. अचानक आलेल्या ढगफुटीसदृश्य अवकाळी पावसाने परिसरात हाहाकार माजवला. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास नागठाणे परिसरातील सर्व गावांमधून जोरदार अवकाळी पावसाला सुरवात झाली. विजेच्या कडकडाट व मेघगर्जनेसह तुफान पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले.यावेळी नागठाणे गावच्या पश्चिमेस डोंगर माथा व पायथ्याला वसलेल्या भैरवगड,कौंदणी सह मांडवे गावात अक्षरशः ढगफुटी झाली.      

येथे पडलेल्या तुफान पावसाने क्षणार्धात ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतात पाणी साचल्याने बांध व ताली फुटून गेल्या.यावेळी गाराही पडल्याने आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले. दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी विहिरीत गेल्याने विहिरीची भरून गेल्या. यावेळी पाणी घरात घुसल्याने अनेक ग्रामस्थांचे प्रापंचिक साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले .सुमारे दीड तास या परिसराला तुफान पावसाने झोडपले.

Related Stories

सातारा : शोरूम मधील दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक

triratna

सरकारी रक्तपेढी रक्तघटक मिळत नसल्याची तक्रार

Patil_p

सातारा जिल्ह्यात १४ रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १४५ निगेटिव्ह

triratna

नागरीकांनी कचरा वर्गीकरण करुन घंटागाडीतच टाकावा-उदयनराजे

Patil_p

काही चांगलंही घडतंय…

datta jadhav

सातारा जिह्यास बर्ड फ्ल्युचा अद्याप धोका नाही

Patil_p
error: Content is protected !!