तरुण भारत

शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या पाठबळाची गरज

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे प्रतिपादन : निपाणीत शासकीय कोविड केअर सेंटरचे उद्घाटन : जोल्ले दाम्पत्याच्या कोरोना कार्याचे कौतुक

वार्ताहर / निपाणी

Advertisements

राज्यात वाढणाऱया कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आणि वाढता कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे कार्य करत आहे. विविध उपाययोजना राबविताना कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. यासाठी अविरत प्रयत्न करत आहे. हा काळ म्हणजे जगण्याची एक परीक्षाच आहे. असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. या काळात शासनाच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांनीही सुरक्षित राहताना कोरोना प्रतिबंधाचे नियम काटेकोरपणे पालन करत पाठबळ दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.

निपाणी येथे श्रीपेवाडी रोडवरील जोल्ले पब्लिक स्कूलमध्ये शासनाच्यावतीने आरोग्य विभागाच्या माध्यमातून महात्मा गांधी रुग्णालय आणि जोल्ले उद्योग समूहाच्या सहयोगातून निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मंत्री शशिकला जोल्ले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कोविड केअर सेंटरची निर्मिती आणि त्याचे महत्त्व विशद केले. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील कोरोना संसर्ग काळात जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर निर्माण केल्याने रुग्णांना झालेला लाभ सांगितला.

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी पुढे म्हणाले, कोरोना काळात नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. हा संसर्गजन्य आजार असून प्रत्येकाने सामाजिक अंतर राखले पाहिजे, मास्क, सॅनिटायझर वापर करताना स्वच्छतेलाही महत्त्व द्यायला हवे, नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनाची लागण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे मतदारसंघाला लागलेले नेतृत्व म्हणजे एक पर्वणी आहे. या नेतृत्वाने कोरोना काळात जनतेचे हित लक्षात घेता वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना राबविल्या आहेत. बेळगाव जिल्हय़ात नव्हे तर संपूर्ण राज्यात कोविड केअर सेंटर निर्माण करण्यासाठी फक्त जोल्ले दाम्पत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे सांगितले.

खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून पूर्वी केअर सेंटर निर्माण करण्यात आले होते. पण त्याला शासनाचे अनुदान नव्हते. यावेळी मात्र शासनाच्या सहयोगाने हे सेंटर निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार दिले जाणार आहेत. ऑक्सिजनची व्यवस्थाही येथे केली आहे. रुग्णांना भोजनाची सोय जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून केली आहे. येत्या काळात अधिकाधिक सुविधा वाढविण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.

यावेळी ज्योतीप्रसाद जोल्ले, तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तहसीलदार गायकवाड, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, एम. पी. पाटील, रामगोंडा पाटील, अविनाश पाटील, समित सासणे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, डॉ. बलराम जाधव, डॉ. संगीता देशपांडे व विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.

या केअर सेंटरच्या माध्यमातून माफक दरात उपचार दिले जाणार आहेत. एकता फौंडेशनच्या माध्यमातून  रुग्णांना मोफत भोजनाची सोय केली आहे. यावेळी डॉ. बसवराज कर्याप्पागोळ, मैनुद्दिन मुल्ला, इरफान महात, राजू मुल्ला, प्रवीण तारळे, गजेंद्र तारळे, प्रतीक तारळे, गौरांग तिळवे, विनायक वडे, विनायक कमते, सुनील शेलार, पांडुरंग भोई आदी उपस्थित होते.

Related Stories

निपाणी महाराष्ट्रात यावी हीच इच्छा

Patil_p

तालुक्मयात सुरू झाली खरीप हंगामाची धांदल

Omkar B

चव्हाट गल्लीत ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

बेळगाव-तिरुपती मार्गावर आणखी एक विमान होणार सुरू

Amit Kulkarni

बडस येथील हॉस्पिटलला ठोकले टाळे

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीतील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील वृद्धेचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!