तरुण भारत

अथणी शहरात 8 दिवस कडक क्लोजडाऊन

सर्वांनी सहकार्य करण्याचे आमदार महेश कुमठहळ्ळी यांचे आवाहन

वार्ताहर / अथणी

Advertisements

अथणी शहर व परिसरात कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. सदर साखळी तोडण्यासाठी अथणी शहर 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात क्लोजडाऊनची अंमलबजावणी कठोर करण्यात येणार आहे. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार महेश कुमठहळ्ळी यांनी केले.

येथील विश्रामधाममध्ये जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यांच्यावतीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, सीईओ दर्शन, एसी लोकेशकुमार उपस्थित होते. आमदार कुमठहळ्ळी पुढे म्हणाले, सध्या अथणी शासकीय रुग्णालयात कोरोना बेडची उपलब्धता करण्यात आली आहे. याबरोबरच शहरात आणखी 100 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंबंधी अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. मलाही दोनवेळा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनेक नागरिक कोरोनाने बळी जात आहेत. याची दखल घेत प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहनही केले.

जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी म्हणाले, अथणी, गोकाक तालुक्यात संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्राशी येथील गावांचा रोजचा संपर्क असल्याने सीमा रस्त्यांवर तपासनाके उभारुन बंदोबस्त ठेवला आहे. शहरात विनाकारण फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. कडक क्लोजडाऊनची अंमलबजावणी करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. यावेळी आरोग्य अधिकारी बसगौडा कागे, तहसीलदार एम. बी. बिरादार, डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, ता. पं. अधिकारी रवि बंगारप्पा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

बसस्थानकाच्या भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर

Patil_p

मण्णुरातील गटारी साफसफाई-औषध फवारणीसाठी आंबेवाडी ग्रा. पं.ला निवेदन

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटच्या खजान्यात खडखडाट

Patil_p

अखेर कणबर्गीत झाली पिण्याच्या पाण्याची सोय

Omkar B

हिंडलगा येथे रुग्ण वाढत असल्याने भीती

Patil_p

कागवाड येथे ऊसतोड मजुरांना धान्य किटचे वाटप

Patil_p
error: Content is protected !!