तरुण भारत

तब्बल 15 दिवसांनी स्वॅब अहवाल उपलब्ध

प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत खडकलाटवासियांतून संताप : 24 तासांत अहवाल देण्याची मागणी

वार्ताहर / खडकलाट

Advertisements

एप्रिल 22 रोजी घेण्यात आलेले स्वॅबचे अहवाल तब्बल 15 दिवसांनी आले असून त्यामध्ये अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचे समजते. इतक्या उशिरा अहवाल प्राप्त झाल्याने सदर कोरोनाबाधित सध्या पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अहवाल प्रलंबित काळात ते क्वारंटाईन न झाल्याने किंवा पुरेशी खबरदारी न घेतल्याने संसर्गाचा धोका वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य खात्याच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. स्वॅब घेतल्यानंतर 48 तासांच्या आत अहवाल द्यावा, अन्यथा गावातून कोणाचाही स्वॅब तपासणीसाठी दिला जाणार नाही, असा इशारा खडकलाट ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिला. याबाबत वरि÷ आरोग्य अधिकाऱयांना सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण चिकोडी तालुक्मयात खडकलाट प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोरोना लसीकरणाबाबत चांगले काम करण्यात आले आहे. नागरिकही लसीकरण करून घेताना सहकार्य करत आहेत. दरम्यान येथील अनेकांनी स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत. पण त्यांचा अहवाल एक-दोन दिवस नाही तर तब्बल 15 दिवसांनंतर देण्यात येत आहे. त्यामुळे 15 दिवसांनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्राम पंचायत, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय गावातही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन अहवाल दोन दिवसांत देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा यापुढे स्वॅब तपासणीला देणार नसल्याचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित नेत्यांना माहिती देणार असल्याचे पाटील यांनी
सांगितले.

लसीकरणाला गती

खडकलाट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीत सुमारे 38 हजार लोकसंख्या आहे. त्यामध्ये 45 वयोगटातील 9333 इतकी लोकसंख्या असून त्यातील तब्बल 6000 पेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण करून चिकोडी तालुक्मयात लसीकरण करण्याचा विक्रम केला आहे. येथील आरोग्य अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका-सेविका चांगल्याप्रकारे काम करीत आहेत.

Related Stories

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धांदल

Omkar B

सकाळच्या सत्रात पुन्हा पावसाला जोर

Patil_p

बसवजयंती घरातच साजरी करा

Rohan_P

कर्नाटक: प्लाझ्मा थेरपीमुळे डॉक्टरांना जीवदान

triratna

देसूर जवळ अपघातात चिकोडीचा तरुण ठार

Patil_p

मच्छे नवभारत सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B
error: Content is protected !!