तरुण भारत

भाजीपाला बहरात… बाजारपेठा कोमात

बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला शेतातच पडून : दरातही घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

प्रतिनिधी / बेळगाव 

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील बहुतांशी शिवारात भाजीपाला बहरात आला असून बाजारपेठा बंदचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱयांना बसत आहे. कोरोनामुळे ऐन बहरात आलेला भाजीपाला बाजारपेठा व वाहतूक बंद असल्याने शिवारात पडून आहे. त्यामुळे भाजीपाला बहरात… बाजारपेठा कोमात, असे चित्र पाहायला मिळत आहे.

ग्रामीण भागात रब्बी हंगामात वाटाणा, हरभरा, मसूर या कडधान्य पिकांबरोबरच बटाटा व भाजीपाल्याचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगाम संपल्यानंतर भाजीपाला पिकविला जातो. मात्र क्लोजडाऊनमुळे शहरातील बाजारपेठांवर मर्यादा आल्या आहेत. शिवाय तालुक्मयातील आठवडी बाजारही बंद आहेत. त्यामुळे उत्पादकांसमोर भाजीपाल्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एपीएमसी येथील भाजीमार्केट बंद करण्यात आले असून शहरातील तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित भाजी मार्केटची निर्मिती केली आहे. मात्र या ठिकाणी क्लोजडाऊनमुळे प्रतिसाद थंडावला आहे. महाराष्ट्रासह गोवा राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने भाजीपाला खरेदी-विक्रीला बेक लागला आहे.

Related Stories

बेळगाव जिल्ह्य़ात शुक्रवारी आणखी 148 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Patil_p

बेडकिहाळ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अभिजित लठ्ठे

Omkar B

सीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी अधिक दक्ष रहा

Patil_p

वीज कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

खानापुरात दुर्गा दौडीचे ठिकठिकाणी स्वागत

Patil_p

मनोहर बिर्जे; रंगभूषेचा किमयागार हरपला

Amit Kulkarni
error: Content is protected !!