तरुण भारत

आपण सुजाण कधी होणार?

क्लोजडाऊनचा फज्जा : चन्नम्मा सर्कलसह शहरात ठिकठिकाणी वाहनांची होतेय कोंडी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लॉकडाऊन झाल्यास परिस्थिती बिकट होणार आहे. मुख्य म्हणजे पुन्हा आर्थिक संकट उद्भवणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको, अशी अपेक्षा करायची आणि त्याचवेळी रस्त्यांवर गर्दीही करायची. असे पूर्ण विसंगत चित्र सध्या शहरात दिसत आहे. सरकार आणि प्रशासन आता नागरिकांना नियमांकडे बोट दाखवून वैतागून गेले आहेत. माझे काम महत्त्वाचे आहे, मला जाणे भाग आहे, असे प्रत्येकजण सांगत असल्याने गर्दी वाढत चालली आहे आणि त्याच क्रमाने कोरोनाचा संसर्गही वाढत चालला आहे.

डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रात काम करणारी सर्व मंडळी केवळ भीती व्यक्त करत नसून हादरून गेली आहेत. ऑक्सिजनची कमतरता, बेडची कमतरता, व्हेंटीलेटर्सची कमतरता कधी नव्हे ते तीव्रतेने जाणवत आहे. याचे कारण रुग्णसंख्या वाढत आहे. त्यावर शक्मय तो गर्दीत न जाणे, घराबाहेर न पडणे हे बंधन पाळणे गरजेचे असताना बेळगावकर मात्र त्याबाबत कमालीची ढिलाई दाखवत आहेत.

क्लोजडाऊनमध्ये काही व्यवसायांना सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्र आणि त्याला अनुसरून येणारे सर्व आरोग्य सेवक व डॉक्टर, पत्रकार, बँकर्स आणि बांधकाम या क्षेत्रांना प्राधान्य दिले गेले आहे. परंतु आपण याच कोणत्या तरी क्षेत्रात आहोत असे सांगण्याची शक्कल लढवत रस्त्यावर गर्दी करणाऱयांचे प्रमाण वाढते आहे. दुर्दैव म्हणजे कार्यालयीन वेळ संपली तरीसुद्धा रस्त्यावर वर्दळ सुरूच आहे.

वेळ वाढवूनही गर्दी तितकीच

गुरुवारी बाजारपेठेत गर्दीचा ओघ कायम राहिला. प्रशासनाने 6 ते 10 ही वेळ दिली, तेंव्हाही गर्दी होतीच आणि आता 12 वाजेपर्यंत वेळ वाढवून दिली तरीही गर्दी तितकीच आहे. सध्या या गर्दीला कसा आवर घालावयाचा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यातच प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता विविध ठिकाणी रस्ते अडवून ठेवले आहेत. परिणामी आतल्या गल्ल्यांमधून प्रामुख्याने बेळगावची ओळख असणाऱया बोळांमधून लोक वाहने हाकत आहेत. अशा अरुंद जागी वाहनांची गर्दी वाढली की कोंडी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडत आहे.

गुरुवारी सकाळी चन्नम्मा सर्कल आणि कोर्टासमोर कमालीची गर्दी झाली. खेडेगावातून लवकर निघून बेळगावला येवून आपली खरेदी उरकणाऱयांची संख्या वाढते आहे. प्रशासनावरती नेहमीपेक्षा अधिक कामाचा ताण आला आहे. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आले आहे. परंतु अनेकदा ते वाहन तपासणी व हेल्मेट तपासणी करण्यातच धन्यता मानत आहेत. हॉस्पिटलमधील बेड्सची उपलब्धता, ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिवीरची उपलब्धता, रुग्णांची वाढती संख्या, लसीकरण मोहिमेचा तपशील या सर्वांबाबत सध्या प्रशासकीय अधिकाऱयांच्या बैठका सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाला पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणे अशक्मय झाले आहे. गर्दी अशीच वाढत राहिली तर रुग्णसंख्या निश्चित वाढण्याचा धोका आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत असताना ज्यांना घरी राहून काम करणे शक्मय आहे अशा सर्वांनी, ज्ये÷ नागरिकांनी आणि लहान मुलांनी घरी बसणे, हा खबरदारीचा उपाय ठरतो. बाजारपेठेत विक्री करणाऱयांमध्येसुद्धा ज्ये÷ांची संख्या अधिक आहे आणि खरेदी करणाऱयांची संख्यासुद्धा अधिक आहे. मध्यवर्ती भाग सोडल्यास अन्यत्र खडा पोलीस पहारा नसल्याने तरुणाई एका वाहनांवरून तिघेजण बसून जात आहेत. मास्क घालणे तरुणाईला पसंत नाहे. अशा सर्व परिस्थितीत गर्दी टाळणे हा एकमेव उपाय सुजाण नागरिक म्हणून आपल्या हातात राहिला आहे. त्याचे पालन करण्याचा विवेक आपण दाखविणार का? हा प्रश्न आहे.

Related Stories

आता क्वारंटाईनसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंग

Patil_p

राजू कागिनकरसह दिवंगत क्रिकेटपटूंना विविध मंडळांकडून श्रद्धांजली

Amit Kulkarni

संक्रांतीनिमित्त मंगाईदेवीची विशेष आरास

Patil_p

साखरपुडय़ानंतर बजावला मतदानाचा हक्क

Patil_p

दत्तक बाळाचे पालकत्व आव्हानात्मक- आनंददायी

Patil_p

मराठी भाषिकांना त्रास दिल्यामुळेच भाजपला हिसका

Amit Kulkarni
error: Content is protected !!