तरुण भारत

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली कोविड आढावा बैठक

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य क्लोज डाऊन असूनही रुग्णांची संख्या कमी होत नाही. दरम्यान, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसमवेत राज्यात कोविड -१९ चा प्रसार कमी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण, लक्ष्मण सावदी , आरोग्यमंत्री के. सुधाकर, महसूलमंत्री आर. अशोक, वनमंत्री अरविंद लिंबावळी, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) जावेद अख्तर आणि बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता उपस्थित होते.

गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. येडियुरप्पा यांनी पूर्वी नमूद केले होते की पंतप्रधानांच्या निर्देशांच्या आधारे पूर्ण लॉकडाऊनची घोषणा करायची की नाही याविषयी निर्णय घेण्यात येईल.

Advertisements

Related Stories

घरपोच पेन्शन सुविधेचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

Patil_p

पाकची नाचक्की! फ्रान्समध्ये नसलेल्या राजदूताला बोलावले माघारी

datta jadhav

गेल्या 24 तासात देशात 941 नवे कोरोना रुग्ण, तर 37 मृत्यू

prashant_c

कर्नाटक : २३ केएएस अधिकाऱ्यांची आयएएस पदी पदोन्नती

Abhijeet Shinde

देशात कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार 378 वर

prashant_c

महाराष्ट्र : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

Rohan_P
error: Content is protected !!