तरुण भारत

काजू उत्पादक शेतकरी क्लोजडाऊनमुळे अडचणीत

बाजारपेठा बंद असल्याने काजू विक्रीचा प्रश्न, उत्पादकांना फटका

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बदलत्या वातावरणामुळे यंदा काजू पिकावर परिणाम झाला असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र यंदा अधिक भाव मिळेल अशा आशेत असणाऱया काजू उत्पादकांसमोर आता क्लोजडाऊनमुळे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात क्लोजडाऊनचा नियम जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेवर मर्यादा आल्या आहेत. शिवाय ग्रामीण भागातील आठवडी बाजार देखील बंद झाले आहेत. त्यामुळे काजू विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा काजूच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच आता विक्रीचा प्रश्न उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने काजू विक्री केंदे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, उचगांव, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, कल्लेहोळ, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते आदी भागात काजूचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. दरवषी  बेळगुंदी व तुर्केवाडी (ता.चंदगड) येथील आठवडी बाजारात विक्री केली जाते. मात्र वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही बाजारपेठा बंद आहेत. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर कडक पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे काजूची वाहतूक देखील थांबली आहे. 

मागील दोन वर्षापूर्वी काजूला साधारण 150 ते 160 रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाला होता. मात्र यंदा कोरोनामुळे काजूच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात काजूचा दर 90 ते 100 रुपयांपर्यंत आहे. काजूला कमी श्रमाचे पीक म्हणून ओळखले जाते मात्र मागील दोन वर्षापासून काजूच्या हंगामातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहेत.

Related Stories

बेळगाव-कोल्हापूर बससेवेवर आठ दिवसांपासून परिणाम

Amit Kulkarni

ग्राम पंचायत निवडणुकीत विविध निर्बंध

Patil_p

भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ दर स्थिर

Patil_p

भटकळ येथे सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

जायंट्स सखीतर्फे बालगौरव पुरस्कार वितरण

Patil_p

सत्ती निवासी संकुल लवकरच दुरुस्त करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!